मांजरीबु प्रतिनिधी दि.1 जानेवारी 2021
सिंधुताई सपकाळ यांचे संस्थेस रोख देणगी, अनाथ मुलांना खाऊ वाटप करुन संग्राम पठारे यांचा वाढदिवस साजरा.
खराडीतील सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक संग्राम पठारे पाटील यांनी वाढदिवसाचे औचित्य साधून मांजरीतील सिंधुताई सपकाळ यांच्या आश्रमास रोख देणगी सुपूर्त केली तर संतुलन संस्थेतील अनाथ मुलांना खाऊ वाटप केले.आमदार सुनिल टिंगरे यांचे प्रेरणेतून व यशवंत प्रतिष्ठान चे संस्थापक धिरज पठारे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली समाजउपयोगी कार्यक्रमासह वृक्षारोपन करण्यात आले.वाढदिवसाचा खर्च टाळून संग्राम पठारे यांनी समाजातील अनाथांना मदतीचा हात दिल्यामुळे त्यांचे परिसरात कौतुक होत आहे.
यशवंत प्रतिष्ठान चे सर्वच सदस्य नेहमीच सामाजिक बांधीलकी जोपासत असून समाजसेवेत अग्रेसर राहीले आहे.संग्राम पठारे पाटील यांचे वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबवले या वेळी धिरज पठारे,अमोल गायकवाड , सुमित वाकडे,सुरज तांबडे,प्रणव ढेरे ,अभिषेक पठारे सह आदी उपस्थित होते.
Post Views: 1,126