विकास कामे तातडीने मार्गी लावा ग्रामविकास विभागाच्या आढावा बैठकीत राज्यमंञी अब्दुल सत्तार यांचे अधिकार्यांना आदेश

राजकीय
Share now
Advertisement
ग्रामविकास विभागाच्या बैठकीदरम्यान राज्यमंञी अब्दुल सत्तार अधिकार्यांसोबत चर्चा करताना..

लोकहित न्यूज,मुंबई दि.6 जानेवारी 2021

विकास कामे तातडीने मार्गी लावणे आवश्यक .
राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी ग्रामविकास विभागाच्या आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना थेट आदेश

औरंगाबाद जिल्ह्यातील फर्दापूर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला प्रशासकीय मान्यता, ग्रामीण भागातील विकास कामे, ग्रामविकास विभागातर्फे देण्यात येणारे पुरस्कार यावर तात्काळ कार्यवाही करा असे आदेश महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी ग्रामविकास विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. ग्रामविकास विभागाच्या बुधवारी मुंबईतील बांधकाम भवन येथे घेतलेल्या आढावा बैठकीत बोलत होते. यावेळी ग्रामविकास विभागाचे उपसचिव उदय जाधव, उपसचिव प्रदीप जैन, उपसचिव ए. के. गागरे, उपसचिव माली, अवर सचिव चांदेकर, अवर सचिव सावणे, आदी उपस्थित होते.

राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी विविध विकास कामासंदर्भात ग्रामविकास विभागाची आढावा बैठक घेतली. या बैठकीत औरंगाबाद जिल्ह्यातील फर्दापूर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला प्रशासकीय मान्यता देण्या संदर्भात चर्चा झाली. त्यात एकूण २५ कोटींपैकी पहिल्या टप्प्यात १० कोटी रुपयाच्या निधीला प्रशासकीय मान्यता देऊन निधी मंजूर करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. तसेच ग्रामविकास विभागातर्फे देण्यात येणाऱ्या यशवंत पंचायतराज अभियान पुरस्कार, आदर्श ग्रामसेवक- ग्रामविस्तार अधिकारी पुरस्कार, आर. आर. आबा पाटील सुंदर ग्राम पुरस्कार, राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्कार, क्षेत्रीय गुणवंत अधिकरी- कर्मचारी पुरस्कारा संदर्भात चर्चा करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *