सध्या तरी मराठ्यांना सरसकट कुणबी दाखले मिळणार नाहीत. ज्याची जुनी कुणबी नोंद आढळली त्यांनाच दाखले देता येणार – मराठा आरक्षण उप समितीचा निर्णय.

चालू घडामोडी मंञालय महाराष्ट्र मुंबई राजकीय
Share now
Advertisement

लोकहित न्यूज, मुंबई. दि 30/10/2024

मंत्रिमंडळ/मराठा आरक्षण उपसमिती पत्रकार परिषदेतील आरक्षणासंदर्भातील महत्त्वाचे मुद्दे

मूळ मराठा आरक्षणाचा निर्णय नाहीच , तसेच सरसकट कुणबी दाखले सध्या तरी देता येणार नाही… ज्यांची जुनी कुणबी नोंद आढळली त्यांनाच कुणबी दाखला मिळणार .

..
1) शिंदे समितीच्या अहवालानुसार कुणबी नोंदी सापडलेल्या मराठ्यांनाच सध्या तरी कुणबी प्रमाणपत्र देण्यात येणार..

2) ११५३० कुणबी नोंदी आढळल्या.
समितीकडून एक कोटी 72 लाख कागदपत्रांची तपासणी. आणखी कुणबी नोंदी शोधण्यासाठी शिंदे समितीने मुदतवाढ मागितली आहे.
सरकारने समितीला दोन महिन्याचा अवधी दिला.

3)मूळ मराठा आरक्षणावर सरकार काम करत आहे.क्युरीटीव्ह पिटीशन वर सरकार जोरात काम करत आहे. तीन निवृत्त न्यायाधीशांची समिती त्यावर काम करत आहे -मुख्यमंत्री शिंदे

4)टिकणार,कायद्याच्या कसोटीत बसणार, मराठा आरक्षण देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.

मराठा बांधवांना सरसकट कुणबी दाखले मिळणार ही महत्त्वपूर्ण मागणी कधी पूर्ण होणार हा प्रश्नच???

सध्यातरी मराठा बांधवांना सरसकट कुणबी दाखले मिळणार नाहीत हेच या पत्रकार परिषदेतून दिसून आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *