रविवारी 29 ऑक्टोबर रोजी हडपसर मध्ये एक मराठा एक कोटी मराठा चा जयघोष.सकल मराठा समाजा तर्फे मोर्चा आयोजन.

चालू घडामोडी पुणे महाराष्ट्र राजकीय सामाजिक
Share now
Advertisement

छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, ससाणे नगर हडपसर येथे सर्व मराठा बांधवानी सकाळी 10.00 वाजता जमा होण्याचे समाजाकडून आवाहन.

हडपसर येथे नेत्यांना, पुढऱ्या ना गाव बंदी, राजकीय सभा, बैठका, दौरे शांततेच्या मार्गाने बंद पाडण्याचे लोकप्रतिनिधी ना मोर्चा तून संदेश, गावात सभा,बैठक घेण्या ऐवजी आजी, माजी आमदार, मंत्री यांनी एकत्रितपणे सरकार वर दबाव आणून मराठा आरक्षण निर्णय निकाली काढावा व संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेला सर्वांनी पाठींबा द्यावा.- सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चा, हडपसर.

लोकहित न्यूज, पुणे दि 28/10/2023

रविवारी 29 ऑक्टोबर रोजी हडपसर मध्ये एक मराठा एक कोटी मराठा चा जयघोष, मराठा संघर्ष योद्धा जरांगे पाटील यांच्या भूमिकेला समर्थन पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चा हडपसर तर्फे मोर्चाचे आयोजन. हडपसर पंचक्रोशीतील मराठा बांधवांनी हजारोच्या संख्येने मराठा मोर्चा त सामील होण्याचे आवाहन करण्यात येत आहे.


मनोज जरांगे पाटील यांच्या आवाहना ला प्रतिसाद देत सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चा हडपसर व परिसर च्या वतीने मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेला समर्थन देणे हा आपला उद्देश आहे.
मराठा समाजाला 50% च्या आत सरसकट OBC मधुन आरक्षण मिळालेच पाहिजे, सरसकट मराठा समाजाला कुणबी दाखले मिळालेच पाहिजे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला जे आवाहन केले आहे की गावागावात साखळी उपोषण, राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी तसेच महत्वाचे म्हणजे गावागावात कँडल मार्च काढा तर त्यांनी सांगितलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत कँडल मार्च च्या जागेवर आपल्या हडपसर आणि परिसरमधील सकल मराठा समजाच्या वतीने लोकशाही मार्गाने शांतता प्रिय पद्धतीने मराठा मोर्चा काढण्यात येणार आहे, तरी हा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, ससाणे नगर ते गाडीतळ बस स्टॉप पर्यंत जाऊन हडपसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात येणार आहे. आणि त्याच वेळी नेत्यांना गावबंदी तसेच कोणतेही राजकीय कार्यक्रम, बैतक घेऊ नये यासाठी आवाहन करण्यात येणार आहे आणि कार्यक्रम घेतलाच तर मराठा क्रांती मोर्चा चे कार्यकर्ते शांततेच्या मार्गाने त्यांचे कार्यक्रम बंद पाडणार आहेत
सर्व समाज बांधवानी मराठा मोर्चा मध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे अशी विनंती मराठा समाज बांधवाना करण्यात येत आहे.

दिनांक आणि वेळ:-
रविवार, दिनांक 29/10/2023 रोजी
सकाळी 10.00 वाजता

सर्वांनी जमा होण्याचे स्थळ
छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, ससानेनगर , हडपसर, पुणे
.

मोर्चा मार्ग – ससानेनगर- हडपसर गाव – मगरपट्टा चौक – परत फिरून गडीतळ – रविदर्शन – परत फिरून पोलिस स्टेशन – समारोप बस स्टॉप

मोर्चाला येताना प्रत्येकाने हातात भगवा झेंडा , डोक्यावर भगवी टोपी, गळ्यात भगवी पट्टी तसेच असेल तर भगवे शर्ट घालून यावे अशी विनंती समाज बांधवाना करण्यात आली आहे.

राजकिय पुढारी नेते, पदाधिकारी या मोर्चात सामील होऊ शकतात, पण कोणत्याही राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याला, नेत्याला, पुढाऱ्याला या मोर्चामध्ये भाषण अथवा पत्रकारांना बाईट देता येणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी असे सकल मराठा मोर्चा, क्रांती मोर्चा हडपसर तर्फे सांगण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *