शिवसेना मध्यवर्ती कार्यालय बाळासाहेब भवन येथे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांचा जनता दरबार संपन्न.

चालू घडामोडी मंञालय मुंबई राजकीय
Share now
Advertisement

शिवसेना मध्यवर्ती कार्यालय बाळासाहेब भवन येथे राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांचा जनता दरबार संपन्न..

नितीन जाधव, बाळासाहेब भवन मुंबई.दि 29/01/25

राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ भाई शिंदे यांच्या सूचनेनुसार शिवसेना पक्षाच्या मंत्र्यांचे जनता दरबार सुरू झाले आहेत. आज बुधवारी बाळासाहेब भवन येथे सकाळच्या सत्रामध्ये पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांचा जनता दरबार संपन्न झाला.
यावेळी राज्यभरातील नागरिक तसेच शिवसेना पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी मंत्री महोदयांसमोर आपल्या समस्या, प्रश्न उपस्थित केले तसेच काही ज्येष्ठ नागरिक व महिलांनी कामा संबंधित निवेदन देऊन चर्चा केली..

यावेळी मंत्री महोदय संबंधित कामाच्या खाते प्रमुखाला थेट संपर्क करून समस्याची सोडवणूक करत होते. एकंदरीतच जनता दरबार मुळे सर्व सामान्यांची कामे जलद गतीने होताना चे चित्र पहावयास मिळाले. सदरच्या जनता दरबार प्रसंगी शिवसेना पक्षाचे प्रवक्ते अरुण सावंत मंत्री शंभूराज देसाई यांच्यासोबत उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *