लोकहित न्यूज,पुणे प्रतिनिधी दि 4 डिसेंबर 2020
पुणे पदवीधर निवडणुकीतही महाविकास आघाडीचीच बाजी राष्ट्रवादीचे अरूण लाड यांचा दणदणीत विजय
यंदा महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा अशी लढत पुणे पदवीधर मतदार संघात पहायला मिळाली. नेहमी भाजपाला साथ देणाऱ्या पुणेकर मतदारांनी यंदा राष्ट्रवादीच्या पारड्यात मते टाकून भाजपाच्या गडाला मोठे खिंडार पाडले आहे. पुणे पदवीधर मतदार संघात 1 लाख 21 हजार अशी सर्वाधिक मते घेऊन महा विकास आघाडीचे अरुण लाड विजयी झाले. पुणे पदवीधर मतदारसंघातही महाविकास आघाडीनंच बाजी मारत गुलाल उधळलाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अरुण लाड यांनी भाजपचे उमेदवार संग्राम देशमुख यांना धूळ चारत दणदणीत विजय मिळवला आहे. अरुण लाड यांना 1लाख 22 हजार 145 मतं मिळाली आहेत. तर भाजपचे संग्राम देशमुख यांना 73 हजार 321 मतांवर समाधान मानावं लागलं.
पुणे पदवीधर निवडणुकीतही महाविकास आघाडीचीच बाजी मारली आहे.राष्ट्रवादीचे अरूण लाड यांचा दणदणीत विजय पहावयास मिळाला.
भाजपाच्या संग्राम देशमुख यांना 70 हजार मते पडली. पदवीधर निवडणुकीत विजयासाठी 1 लाख 15 हजार मतांचा कोटा निश्चित करण्यात आला होता. हा कोटा लाड यांनी पहिल्या पसंती क्रमांक मिळवून पूर्ण केला. लाड हे सकाळी 9 वाजता शरद पवार यांच्या भेटीला मोदीबागेत जाणार आहेत. तर शिक्षक मतदारसंघात प्रा. जयंत आसगावकर यांची विजयाकडे घोड़ दौड सुरू; अधिकृत निकाल दुपारपर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे.
राज्यात विधानपरिषद निवडणुकीच्या निकालाची धामधूम सुरु आहे. महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा थेट सामना होत आहे. दरम्यान पुणे पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीचे अरुण लाड (Arun Lad) यांचा दणदणीत विजय झाला आहे आहे. अरुण लाड यांनी भाजपच्या संग्राम देशमुख यांचा पराभव केला असून राष्ट्रवादी कार्यकर्त्यांकडून मतमोजणी केंद्राबाहेर जल्लोष सुरु केला आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार अरुण लाड यांना अरुण लाड याना तब्बल 122145 मते मिळाली तर संग्राम देशमुख यांना 73324 मते मिळाली त्यामुळे लाड यांचा तब्बल 48 हजार 824 मतांनी दणदणीत विजय झाला.