अरुण दादा बेल्हेकर संस्थेचे अध्यक्ष शैलेंद्र बेल्हेकर यांचे कार्य प्रशंसनीय ,गरीबांना करतात जेवण वाटप.

चालू घडामोडी सामाजिक
समाजसेवक शैंलेंद्र बेल्हेकर अन्नदान उपक्रमात जेवणवाटप करताना.

उपक्रमाचे होत आहे कौतुक

बेल्हेकर संस्थेचा आपले जेवण आपल्या बांधवासाठी उपक्रम प्रशंसनीय..
बाबा हे जेवण घ्या उपाशी राहु नका ,हक्काने मागा भूकलेल्या गरजूवंताना घासातला घास भरवणारा समाजसेवक शैलेंद्र बेल्हेकर सर्वांनाच भावला.

लोकहित न्यूज ,हडपसर वार्ताहर
दि.25/5/2021

कोरोना संसर्गामुळे माणसाचे जीवनमान फारच बिकट झाले आहे , तर हातावर पोट असणारी गोर गरीब जणता तर दोन वेळचे जेवण मिळवण्यासाठी आटापिटा करताना दिसते आहे. सध्या कडक निर्बंध असल्यामुळे अनेकांना रोजगार नाही काम नाही तर पोटाला काय खाणार ? या परिस्थिती मुळे अरुण दादा बेल्हेकर युवा राष्ट्र निर्माण संस्था संलग्न नेहरु युवा केंद्र पुणे संस्थेचे शैलेंद्र बेल्हेकर यांनी आपले जेवण आपल्या बांधवासाठी हा समाजउपयोगी उपक्रम हाती घेतला आहे.पंधरा दिवसातून बेल्हेकर व त्यांचे सहकारी हडपसर व परिसरातील सोसायटीतून जेवणाचे डबे तयार करुन ते गोरगरीब नागरिकांना वाटप करत असून संस्थेमार्फत पाणी बाटली वाटप करत आहेत.स्वयंपाक घरात बनवलेली ताजी चपाती ,भाजी ,भात, वरण गरमागरम जेवण सकाळी हडपसर परिसरातील भूकलेले तहानलेल्या लोकांना वाटप करत आहेत. दोन दिवसापासून येथिल नागरिक सकाळपासुनच वाट पहात बसतात जेवण कधी मिळणार ,आशातच समाजसेवक शैलेंद्र बेल्हेकर त्यांना नित्यनियमाने जेवण पुरवत असल्यामुळे त्यांची सोय झाली.या लाॕकडाऊन काळात आपल्या घासातला घास भरवणे ही समाजाची खरी सेवा आहे तसेच अन्नदान हेच सर्व श्रेष्ठ दान आहे त्यामुळे मला या कामात अत्यंत आनंद मिळत असल्याचे बेल्हेकर यांनी सांगितले .

अनेक मिञ ,उद्योजक यांनी वाढदिवसाचा अनाठायी खर्च टाळून संस्थेस सहकार्य केले तसेच अन्नदान उपक्रमास मदत केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.या अन्नदान उपक्रमास नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला असून बेल्हेकर संस्थेच्या उपक्रमाचे हडपसर पंचक्रोशीत कौतुक होत आहे.संस्था अध्यक्ष शैलेंद्र बेल्हेकर,अतुल रासकर,मीनाक्षी कुमकर, डॉ.शोभा पाटील,प्रदीप मगर , कैलास कुंजीर,रमेश उंद्रे,महेश गळगे,राहुल कुदळे,विकास हिरुळकर,आदित्य घाडिगावकर, अमोल शिंगडगाव,अर्चना दूंगरवाल,
शंकर बावकर,गोरख आड़ेकर,मसा जाधव,मधुकर कवडे यांनी ह्या उपक्रमाचे संयोजन केले.नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी यशवंत मानखेडकर यांनी मार्गदर्शन केले.

Share now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *