कै.अजिंक्य घुले प्रथम पुण्यस्मरण निमित्त राष्ट्रवादीचे अजित घुले यांचेकडून आमदार निलेश लंके यांच्या कोवीड सेंटरसाठी 51000 चा धनादेश सुपूर्त.

चालू घडामोडी राजकीय सामाजिक
Share now
Advertisement

आमदार निलेश लंके यांनी राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा वरिष्ठ नेते सुरेश घुले व युवा प्रदेश सरचिटणीस अजित घुले यांचे आभार व्यक्त केले आहेत.

लोकहित न्यूज ,पारनेर वार्ताहर दि.24/5/2021
  • कै.अजिंक्य घुले यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्ताने अजित घुले यांचेकडून आमदार निलेश लंके यांना 51000 रु मदतनिधी सुपूर्त

कोरोनाची दुसरी लाट नेस्तनाबूत करण्यासाठी महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात सुसज्ज अशी कोरोना सेंटर सुरु करण्यात आली .अशाच प्रकारे पारनेर चे राष्ट्रवादीचे धडाडीचे आमदार निलेश लंके यांनी प्रबळ ईच्छाशक्तीच्या जोरावर लोकसहभागातून 1000 पेक्षाही जास्त खाटांचे अत्याधुनिक कोरोना सेंटर सुरु करुन आदर्श निर्माण केला. सदरच्या कोरोना सेंटर मध्ये महाराष्ट्र भरातून मदतीचा ओघ सुरु आहे .यातच मांजरी पुणे येथिल राष्ट्रवादी युवक चे प्रदेश सरचिटणीस अजित घुले यांनी कै.अजिंक्य घुले प्रथम पुण्यस्मरण निमित्तानं शरदचंद्रजी पवार कोवीड केअर सेंटर ला 51000 रु धनादेश सुपूर्त केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस चे वरिष्ठ नेते सुरेश घुले यांचे पुञ कै.अजिंक्य घुले यांच्या स्मरणार्थ युवा सरचिटणीस अजित घुले यांच्या नियोजनातून रक्तदान शिबीर, गरजूंना साहित्य किट वाटप, गरीब मुलांसाठी शैक्षणिक साहित्य वाटप,महिलासाठी आॕनलाईन स्पर्धा असे विविध उपक्रम राबविण्यात आले .शारदा सोशल फाऊंडेशन व राष्ट्रवादी काँ आयोजित विविध सामाजिक कार्यात राष्ट्रवादी चे युवा प्रदेश सरचिटणीस अजित घुले नेहमीच अग्रेसर असतात. त्यांनी गतवर्षी असंघटीत कामगारांसाठी अन्नछञ सुरु करुन अनेक गरजू कामगारांना आधार दिला होता.
अशातच त्यांनी युवा कार्यकर्त्यांसमोर कोरोनाग्रस्तासाठी मदतनिधी पोहच करण्याची संकल्पना मांडली त्यास सकारात्मक प्रतिसाद मिळाला व पारनेर येथिल कोविड सेंटर ला मोजक्या कार्यकर्तेच्या उपस्थितीत मदत निधी सुपूर्त केला.
या प्रसंगी अजित घुले ,सामाजिक कार्यकर्ते विश्वास भापकर, संशोधक तथा सामाजिक कार्यकर्ते निलेश टकले ,उद्योजक शञुग्न गव्हाणे उपस्थित होते.
कोवीड सेंटरसाठी मदतरुपी निधी सुपूर्त केल्यामुळे अजित घुले यांचे जनमाणसात कौतुक होत आहे.
या वेळी
आमदार निलेश लंके यांनी राष्ट्रवादी युवकचे अजित घुले व राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते सुरेश घुले यांचे आभार व्यक्त केले आहेत
.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *