उत्तर कोल्हापूर विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेस च्या जयश्री जाधव यांचा मोठा विजय भाजप च्या सत्यजित कदम यांचा दारुण पराभव..

चालू घडामोडी महाराष्ट्र राजकीय
Share now
Advertisement

लोकहित न्यूज.. कोल्हापूर दि 16/04/2022

कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीचा अंतिम निकाल हाती आला असून काँग्रेसच्या जयश्री जाधव यांनी दणदणीत विजय मिळवला तर भाजपच्या सत्यजित कदम यांचा दारुण पराभव झाला. आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार, काँग्रेसच्या जयश्री जाधव या ९२०१२ इतक्या मतांनी विजयी झाल्यात तर भाजपच्या सत्यजित कदम यांना ७३१४७ इतकी मत मिळाली आहे. त्यामुळे भाजपसाठी हा मोठा धक्का मानावा लागणार आहे काँग्रेसच्या जयश्री जाधव यांचा दणदणीत विजय, भाजपचा दारुण पराभव
महाविकास आघाडी विरोधात भाजप अशा अत्यंत चुरशीच्या या निवडणुकीमध्ये काँग्रेसला गड राखण्यात यश आले आहे. आक्रमक प्रचार आणि नेत्यांची फौज मैदानात उतरवूनही विजय न मिळाल्याने भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जातो. या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय आरोप-प्रत्यारोप करण्यात आले होते. पंढरपूरच्या विठ्ठलाच्या आशीर्वादानंतर कोल्हापुरातही अंबाबाईचा आशीर्वाद मिळेल असा विश्वास विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दाखवला होता. पण या निवडणुकीमध्ये भाजपला पराभव पत्करावा लागला आहे. त्यामुळे भाजप यावर काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं महत्त्वाचं आहे.

या पोटनिवडणुकीसाठी राज्य पातळीवरील नेते आणि कार्यकर्त्यांची जोरदार प्रचार फौज उतरली होती. आरोप-प्रत्यारोपांनी राजकीय वातावरण तापलं होतं. अशात पालकमंत्री सतेज पाटील आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासाठी ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची केली होती. पण आता काँग्रेस यावरून भाजपला कशाप्रकारे टार्गेट करतं हे सुद्धा आता पाहणं महत्त्वाचं आहे.

या निवडणुकांमध्ये हिंदुत्व आणि स्वाभिमान असे मुद्दे प्रचारात आले होते. काँग्रेसच्या जयश्री जाधव यांनी आपले हिंदुत्व आणि स्वाभिमान विजयी झाला, अशी प्रतिक्रिया दिली आहे. इतकंच नाही तर संपूर्ण शहरात त्यांच्या विजयाचे होर्डिंग्ज लावण्यात आले आहेत. महाविकास आघाडी भक्कम असल्याचा पुरावा देण्यासाठी आघाडीच्या नेत्यांसाठी ही निवडणूक महत्त्वाची होती. त्यामुळे ठाकरे सरकारचा हा विजय २०२४ च्या निवडणुकांसाठी देखील महत्त्वाचा असणार आहे.

या निकालाचा नक्कीच २०२४ च्या निवडणुकांवर परिणाम पाहायला मिळेल. दरम्यान, या विजयानंतर आता महाविकास आघाडीमध्येच काही राजकीय खलबतं होतात का? हे पाहणं महत्त्वाचं आहे. कारण काँग्रेस उमेदवार उत्तर कोल्हापुरात निवडून आल्यामुळे २०२४ मध्ये काँग्रेस या जागेवर आपला हक्क सांगू शकते. त्यामुळे शिवसेनेसाठी कुठेतरी ही बाब अडचणीची ठरू शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *