लोकहित न्यूज पुणे 30नोव्हेंबर 2020
सरकारच्या वर्षपूर्तीलाच वडगावशेरी मतदार संघातील पाणी प्रश्नाची आश्वासनपूर्ती होत असल्याचा आनंद. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार ,पालकमंञी अजित पवार प्रशासनाच्या पाठपुराव्याला यश -आमदार सुनील टिंगरे वडगावशेरी पुणे
सरकारच्या वर्षपूर्तीलाच वडगावशेरी मतदार संघातील पाणी प्रश्नाची आश्वासनपूर्ती असल्याचा आनंद आहे.शहराच्या पूर्व भागातील पाणी प्रश्न पूर्णपणे सुटणार आहे योजना काम शंभर टक्के पूर्ण झालेले आहे. 1 डिसेंबर पासून प्रत्यक्ष चाचणी सुरुवात होणार वडगावशेरी मतदार संघाचे आमदार सुनील टिंगरे यांची माहिती .अनेक वर्षापासून भामा-आसखेड प्रकल्प संदर्भात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार तसेच पालकमंत्री अजित दादा पवार यांच्यासह प्रशासनाने सदरच्या योजनेसंदर्भात सातत्याने पाठपुरावा केलेला होता. आमदार सुनील टिंगरे यांनी पुढे बोलताना सांगितले की, गेल्या जवळपास सात वर्षापासून प्रतीक्षेत असलेल्या भामा-आसखेड पाणीपुरवठा योजनेचे काम शनिवारी मध्यरात्री शंभर टक्के पूर्ण झाले. 1 डिसेंबर पासून प्रत्यक्ष पाणीपुरवठा चाचणी सुरुवात होणार आहे त्यानंतर हे पाणी थेट वडगावशेरी येथील नागरिकांच्या घरात पोहोचणार असल्याने असल्यामुळे पूर्व भागातील नागरिक, लोकप्रतिनिधी तसेच सर्वसामान्य व्यक्ती यांना हक्काचे पाणी मिळणार आहे .शहराच्या पूर्व भागातील वडगावशेरी, चंदननगर ,खराडी, विमान नगर, कल्याणी नगर, येरवडा ,विश्रांतवाडी, धानोरी, लोहगाव या भागाचा पाणीपुरवठ्याचा महत्वपूर्ण प्रश्न सोडविण्यासाठी महापालिकेकडून भामा-आसखेड पाणीपुरवठा योजना हाती घेतली होती या योजनेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आघाडीच्या काळात जे एन यु आर एम योजनेअंतर्गत केंद्र व राज्य सरकारकडून 380 कोटी हा निधी मंजूर केला होता. सन 2013 रोजी सुरू केलेल्या या योजनेचे काम डिसेंबर 2017 पर्यंत पूर्ण करण्याची मुदत होती .मात्र प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या अडचणीमुळे जलवाहिनीचे काम बंद पाडले जात होते. सदरच्या विषयाबाबत आमदार आमदार टिंगरे म्हणाले की, विधानसभा निवडणुकीत वडगावशेरी मतदार संघाचा पाणी प्रश्न सोडविण्याचे आश्वासन आम्ही दिले होते महा विकास आघाडी सरकारची वर्षपूर्ती होत असतानाच या योजनेचे काम पूर्ण होत असल्याचा मनापासून आनंद होत आहे. सदरचे काम मार्गीलावण्यासाठी अजित दादा पवार यांची भूमिका मोठी असल्याची माहिती आमदार टिंगरे यांनी दिली.
”
Post Views: 667