वाघाचे कातडं पांघरलेला कोल्हा ओळखा
लोकहित न्यूज. नाशिक दि 22/04/2022
वाघाचे कातडे पांघरलेला कोल्हा ओळखा मराठा समाजाला आवाहन – मराठा नसलेल्या मिटकरींनी आमच्या समाजाच्या तरूणाईची माथी भडकावून नये – भाजप प्रवक्ते अजित चव्हाण
राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्या वक्तव्यामुळे समाजात, सोशल मिडीयात महाराष्ट्रात जातीय, सामाजिक सौहार्द धोक्यात आलं आहे आहे. मराठा- ब्राम्हण समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणारे मिटकरी मराठा नाहीत. त्यांनी मराठा समाजाच्या तरूणाईचे माझे भडकावून जातीय तेढ निर्माण करू नये.ज्या मराठा समाजाने ओळख दिली, ज्या समाजामुळे आमदारकी मिळाली त्या मराठा समाजाचा वापर करणे आता बंद करावे. मराठा तरूणांनी लक्षात घ्यावे अमोल मिटकरी मराठा नाही. वाघाच कातड पांघरलेला कोल्हा आहे. मराठा नसलेल्या मिटकरींनी मराठा तरूणाईला भडकावून जातीय तेढ निमार्ण करू नये.ब्राम्हण-मराठा या समाजांनी बहुजन समाजाला सोबत घेऊन दिल्लीचे तख्त जिंकल्यांचा जाज्वल्य इतिहास आहे हे विसरू नये. सोशल मिडीयावर समाजात आपापसात भांडण लावणा-या प्रवृत्तींना हेच अपेक्षित आहे तो प्रयत्न हाणून पाडा, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी अमोल मिटकरी यांच्या सारख्या प्रवृत्तींवर कठोर कारवाई करावी असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे प्रदेश प्रवक्ते अजित चव्हाण यांनी केले आहे.