पोलिसांच्या वायरलेस विभागाची पुनर्रचना नवे नाव मिळाले तांत्रिक प्रशासकीय बाबी व तांत्रिक अडचणी दूर व्हाव्यात पदोन्नती सेवाजेष्ठता बदल्यांबाबत सुसूत्रता यासाठी पुनर्रचना केली – सतेज पाटील गृहराज्यमंत्री महाराष्ट्र

चालू घडामोडी मंञालय मुंबई राजकीय
Share now
Advertisement
  • आता वायरलेस विभागाला वायरलेस ऐवजी पोलीस दळणवळण माहिती-तंत्रज्ञान व परिवहन विभाग असे संबोधले जाणार आहे..

लोकहित न्यूज, मुंबई.. दि.4/04/2022

आता वायरलेस विभागाला पोलीस दळणवळण माहिती तंत्रज्ञान व परिवहन विभाग असे नामकरण होणार. महाराष्ट्र पोलीस दलाच्या स्थापनेपासून कार्यरत असलेला बिनतारी संदेश विभाग आता पोलिस दळणवळण माहिती तंत्रज्ञान व परिवहन विभाग या नावाने ओळखला जाणार आहे.या विभागातील विविध शाखा आणि तेथील प्रशासकीय बाबींचा आढावा घेऊन त्यांची नावासह नव्याने पुनर्रचना करण्यात आली आहे त्याबाबतच्या प्रस्तावाला गृह विभागाने नुकताच हिरवा कंदील दाखवला आहे

वायरलेस विभागाचे मुख्यालय पुण्यात असून ते प्रत्येक आयुक्तालय, अधीक्षक कार्यालयाशी संलग्न आहे राज्यातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी कायदा व सुव्यवस्थेबाबत च्या सूचना व संदेश तातडीने देण्याचे काम या विभागातर्फे केले जाते. या विभागात प्रशासकीय बाबींच्या अनुषंगाने असलेली प्रक्रिया गुंतागुंतीची होती. ती सुलभ करून कामात अधिक सुसूत्रता यावी यासाठी विभागाची पुनर्रचना करून त्याचे नाव बदलण्याचा प्रस्ताव गेल्या वर्षी 14 जानेवारीला मंत्रालयात झालेल्या बैठकीत आला होता.

त्यानुसार 25 ऑगस्टला विभागाकडून आलेल्या प्रस्तावाला राज्य सरकारने मान्यता दिली आहे त्यामुळे या विभागाला वायरलेस ऐवजी पोलीस दळणवळण माहिती-तंत्रज्ञान व परिवहन विभागाचे संबोधले जाणार आहे.

पदांचा सुधारित आकृतीबंध खालीलप्रमाणे. नवीन सुधारित संरचनेमध्ये कार्यरत असलेल्या आणि सध्या कार्यरत असलेल्या 3 962 मंजूर पदांची पुनर्रचना केली असून त्यातील पोलीस दलातील रद्द करण्यात आलेली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक या संवर्गातील 321 पदे रद्द करून नव्याने 228 पदे निर्माण केली आहेत त्यानुसार आता एकूण 3 869 पदांचा सुधारित आकृतिबंध बनवला आहे

या विभागांमध्ये प्रामुख्याने अभियांत्रिकी व वाहतूक या दोन स्तरांवर कामे केली जातात. त्यामध्ये प्रशासकीय कामातील अडथळा दूर व्हावा तांत्रिक व प्रशासकीय बाबी व तांत्रिक अडचणी दूर व्हाव्यात पदोन्नती सेवाजेष्ठता बदल्यांबाबत सुसूत्रता रहावी यासाठी पुनर्रचना केली आहे.सर्व विभागांशी संबंधित नाव देण्यात आले आहे- सतेज पाटील गृहराज्यमंत्री

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *