महसूल यंञणेच्या बळकटी करणासाठी प्रयत्न करणार राज्यमंञी अब्दुल सत्तार यांचे आश्वासन मुंबई जिल्हाधिकारी कार्यालयातील आढावा बैठकी दरम्यान विविध विषयावर चर्चा.

मुंबई राजकीय
Share now
Advertisement

लोकहित न्यूज नेटवर्क ,मंञालय मुंबई.दि.6डिसेंबर 2020

महसूल यंत्रणा बळकटी करणासाठी प्रयत्न !
मुंबई जिल्हाधिकारी कार्यालयात घेतलेल्या आढावा बैठकीत राज्यमंत्री अब्दुल सत्तारांचे आश्वासन


मुंबई जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र आणि लोकसंख्येची घनता पाहता त्या प्रमाणात महसूल विभागाची यंत्रणा कमी आहे. तरीही महसूल वसुलीचे प्रमाण समाधानकारक आहे. महसूल यंत्रणा बळकट करण्याचे आश्वासन महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात घेतलेल्या प्रशासनिक आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांच्यासह सर्व उपजिल्हाधिकारी उपस्थित होते.

वर्ग २च्या जमिनी वर्ग १ च्या करण्यासाठी चर्चा .


मुंबई शहरातील वर्ग २ च्या जमिनी वर्ग १ मध्ये करण्यासाठी बैठकीत सविस्तर चर्चा झाली. शासनाच्या या धोरणामुळे महसुलात मोठ्याप्रमाणात वाढ होणार आहे. या कामासाठी महसूल अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची संख्या पूर्ण क्षमतेने भरण्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. मुंबई जिल्ह्यात एक उपविभागीय अधिकारी कार्यालय आणि दोन तहसील कार्यालयाची लवकरच स्थापना करण्याच्या प्रस्तावाला गती देण्या संदर्भात या बैठकीत चर्चा करण्यात आली. त्यामुळे मुंबई जिल्ह्यातील नागरिकांची सोय होणार असल्याचे राज्यमंत्री सत्तार यांनी सांगितले. तसेच मुंबई शहरात प्रभाग आणि वॉर्ड पातळीवर तलाठ्यांची गरज आहे. त्यामुळे लवकरच तलाठी भरती प्रक्रिया राबविण्याबाबत शासनस्तरावर गती देण्यासंदर्भात बैठकीत चर्चा करण्यात आली.

बाबा हाजीअली दर्ग्याचे नूतनीकरण व सौंदर्यीकरण होणार….


मुंबईतील श्रद्द्धास्थान असलेल्या बाबा हाजीअली दर्ग्याचे लवकरच नूतनीकरण आणि सौंदर्यीकरणासाठी जिल्हा नियोजन समितीमधून निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच सर्व धर्माच्या भाविकांना सोयी, सुविधा पुरविण्यासाठी शासनाच्या विशेष नियोजन आहे. त्यामुळेबाबा हाजीअली दर्ग्याचे लवकरच नूतनीकरण आणि सौंदर्यीकरणाच्या कामाला गती देण्यासाठी बैठकीत चर्चा करण्यात आली.

ईव्हीएम साठी गोडाऊनची निर्मिती….


निवडणुकीनंतर ईव्हीएम सुरक्षित ठेवण्यासाठी मुंबई शहरातलवकर गोडाऊनची निर्मितीसाठी भारत निवडणूक आयोगाने निधीची तरतूद केली आहे. या गोडाऊनसाठी मुंबई शहरात जागा उपलब्ध करून देण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *