लोकहित न्यूज ,मुंबई
गृहमंत्री महोदयांचे बोलणे कमीत कमी असावे .ऊठसूट कॕमेरा समोर जाऊ नये.
संजय राऊतांनी अनिल देशमुख यांच्यावर आक्रमकपणे तोफ डागली आहे. ते म्हणतात अनिल देशमुख यांनी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांशी कारण नसताना पंगा घेतला. गृहमंत्र्याचे कमीत कमी बोलणे असावे . उठसूट कॅमेऱ्यासमोर जाणे व चौकशीचे जाहीर आदेश देणे बरे नव्ह . सौ सोनार की एक लोहार की असे वर्तन गृहमंत्र्यांचे असायला हवे. पोलिस खात्याचे नेतृत्व फक्त सॅल्युट घेण्यासाठी नसते ओ . ते कणखर नेतृत्व देण्यासाठी असते. हा कणखरपणा प्रामाणिकपणातून निर्माण होतो हे विसरून कसे चालेल..शिवसेना नेते संजय राऊत हे स्पष्ट आक्रमक ,सडेतोड भूमिका नेहमीच मांडत असतात पण थेट गृहमंत्री अनिल देशमुख यांचे कार्यपद्धती वर वार केल्यामुळे
सत्ताधारी पक्षातून आश्चर्य व्यक्त होत आहे तर विरोधकांना देशमुखांना घेरण्याची आयती संधी मिळाल्याचे चिञ पहावयास मिळत आहे.