क्राईम ब्रँच वसुली केंद्र , एक ही पोलीसस्टेशन असे नाही की जिथे पैसा जमा होत नाही – मीरा बोरवणकर

चालू घडामोडी मुंबई
Share now
Advertisement

लोकहित न्यूज ,मुंबई

राज्यात पोलीस प्रशासनात प्रचंड खाबुगिरी असल्याचा धक्कादायक खुलासा मीरा बोरवणकर यांनी केला. पोलीस दलात पैसे खात नाही असा अधिकारी, कर्मचारीच नसल्याचे त्यांनी सांगितले. एकही पोलीस स्टेशन नाही कि जिथे पैसे जमा होत नाहीत. यावेळी त्यांनी स्वतःचा अनुभव सांगितला. प्रत्येक पोलीस स्टेशन राजकीय पक्षांची सोय आणि पैसे कमावण्याचा अड्डा झाला आहे. राजकारणी लोकांना हव्या तश्याच नियुक्त्या होतात. मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण गेल्यानंतर परिस्थिती बिघडत आहे, असं देखील बोरवणकर म्हणाल्या.

सचिन वाझे यांच्या संदर्भात प्रश्न विचारला असता मीरा बोरवणकर म्हणाल्या की वाझे यांनी हे एकट्याने केले असेल हे शक्य नाही. त्यांच्या मागे मोठे पाठबळ असणार. क्राईम ब्रँच हे खंडणी वसुली केंद्र झाले आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेले आरोप गंभीर असून याची न्यायालयान चौकशी व्हावी, असे मत मीरा बोरवणकर यांनी मांडले.माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या लेटरबॉम्बनंतर पोलीस प्रशासनातील वाईट प्रवृत्तींवर चर्चा सुरु झाली आहे. पोलीस दलात पैसे खात नाही असा अधिकारी, कर्मचारीच नाही, एकही पोलिस स्टेशन नाही कि जिथे पैसे जमा होत नाहीत, असा धक्कादायक दावा निवृत्त IPS मीरा बोरवणकर यांनी केला

.

दरम्यान, महाराष्ट्र पोलीस प्रशासनात वाईट प्रवृत्ती वाढल्या आहेत. त्यामुळे पोलिसींग पुर्ण संपले आहे. महाराष्ट्राने केरळ, तेलंगणा या राज्यांकडून शिकावे, असा सल्ला देखील मीरा बोरवणकर यांनी दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *