लोणीकाळभोर येथे हजरतबागुलशाहवली दर्गा ट्र्स्ट तर्फे उत्साहात ऊरुस साजरा.

चालू घडामोडी सामाजिक
Share now
Advertisement

लोकहित न्यूज ,लोणीकाळभोर .पुणे दि.14/10/2021

लोणीकाळभोर येथे कोरोना नियम पाळून हजरतबागुलशाहवली दर्गा ट्र्स्ट तर्फे ऊरूस साजरा करताना एकञ जमलेले मुस्लीम बांधव

लोणी काळभोर येथे हजरत बागुलशाहवली दर्गा कडून
तिथी प्रमाणे १२,१३,१४ आॕगस्ट ला दर्गा ट्रस्टने कोरोना नियम पाळून साध्या पध्दतीने ऊरूस साजरा केला.


कोविडचे संकट टळले नसून त्याचे भान ठेवून अगदी साध्या पद्धतीने ता.१२संदल,ता. १३ ऊरूस लंगर (महाप्रसाद),व
ता.१४ जियारत विधिप्रमाणे साजरा करण्यात आला.


सदर कार्यक्रम करत असताना दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांना सुरक्षित अंतर ठेवून दर्शन दिले जात होते.प्रौढ व महिलांना साठी१७५०
लंगर (महाप्रसाद) ची पाकीटे देण्यात आली.या ऊरुसात मुस्लीम बांधावांकडून शेतकरी बांधवासाठी शेतीसंकट दुर व्हावे म्हणून दुवा मागण्यात आली व कोवीडरूपी संकटातून सर्व जातीधर्माच्या लोकांची लवकर सुटका होण्यासाठी प्रार्थना केली. सरकारने चालवलेल्या स्वातंत्र्याचा अमृत मोहत्सव अभियान व कवचकुंडल मोहिम कोवीड लसीकरणात भाग घेण्यासाठी लोकांना जनजागृती करून दर्गा ट्रस्टतर्फे आव्हान केले असल्याचे सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *