मांजरीत के.के.घुले विद्यालयात कोवीड लसीकरणाला नागरिकांचा उदंड प्रतिसाद..
नितीन जाधव लोकहित न्यूज ,मांजरीबु.
दि.6/04/2021
कोरोना संसर्गाने संपूर्ण देशभर थैमान घातलेले आहे अशातच सध्या कोरोना वर जालीम उपाय म्हणून महाराष्ट्र भर कोरोना प्रतिबंधक लस टोचण्याची मोहीम शासनातर्फे हाती घेण्यात आली आहे.त्यात 45 वर्षे वयापुढील नागरिकांना महापालीका,जि.प.तसेच स्थानिक प्रशासनामार्फत मोफत कोविड लस टोचली जात आहे.
मांजरीबु. येथिल के.के.घुले विद्यालयात दि.1 एप्रिल रोजी जि.प.मार्फत मोफत कोवीडचे लसीकरण सुरु झाले त्यास उदंड प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे. मांजरीबु. येथे जि.प.सदस्य दिलीप आण्णा घुले तसेच सरपंच शिवराज आप्पा घुले यांच्या प्रयत्नातून जि.प.मार्फत लसीकरण मोहीम सुरु झाली तेव्हा 1 एप्रिल रोजी 200 नागरिकांनी लसीकरणाचा लाभ घेतला.तर 2 तारखेस 220 जणांनी लाभ घेतला ,3 तारखेस 276 जणांनी लाभ घेतला तसेच 5 तारखेस 363 जणांचे लसीकरण पूर्ण झाले .पाच तारखेपर्यंत एकूण 1059 नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाल्याची माहिती मांजरीबु.उपपथकाचे व्यवस्थापक ,प्रशिक्षक तथा आरोग्य सहाय्यक सुलाखे एस एस यांनी दिली आहे.
मांजरीबु.येथिल लसीकरणाचा लाभ घेण्याचे आवाहन वैद्यकीय अधिकारी डि.जी.जाधव यांनी केले आहे.
लसीकरणासाठी येण्यापूर्वी पोटभर जेवण करुण यावे तसेच इंजेक्शन टोचलेली जागा चोळू नये.त्याच बरोबर लसीकरण झालेनंतर दहा मिनीट पाणी पीने टाळावे ,तेलकट पदार्थ सेवन करु नये किमान एक दिवस विश्रांती घ्यावी व गोळ्या खाव्यात त्यामुळे आपणास कसलाच ञास होणार नाही .या संबंधित ईथंभूत माहीती ,थोडक्यात आरोग्य शिक्षण वैद्यकिय अधिकारी देत आहेत.लस ही पूर्णपणे सुरक्षित असून काळजी करण्याचे कारण नाही सबंध नागारिकांनी लाभ घ्यावा असे मत मांजरी उपपथकाच्या वैद्यकीय अधिकारी डाॕ.मनिषा देशपांडे यांनी स्पष्ट केले.
सदरच्या लसीकरणासाठी मांजरीबु.ग्रामपंचायतीकडून सहकार्य होत असून आरोग्य कर्मचाऱ्यांना शुध्दपाणी ,चहा ची सोय केली आहे.तसेच गावचे पोलीस पाटील अमोल भोसले यांची मदत होत आहे.सदरचे लसीकरण जि.प.सदस्य दिलीप आण्णा घुले तसेच वैद्यकीय अधिकारी डि.जी.जाधव यांच्या अधिपत्याखाली होत असून उपकेंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डाॕ मनिषा देशपांडे यांचे मार्गदर्शनाखाली सुरु असून व्यवस्थापन सुलाखे एस एस पार पाडत आहेत .संपूर्ण लसीकरणासाठी मांजरी चे सरपंच शिवराज आप्पा घुले व सदस्य मंडळींनी सहकार्य केले असल्याचे आरोग्य कर्मचारी सांगत आहेत.या वेळी परिचारिका अश्विनी भगत ,स्नेहल चव्हाण या लस टोचण्याची भूमिका पार पाडत आहेत तर संपूर्ण डाटा फिडींगसाठी गीता लोंढे,सुरेखा दाते,अजित घुले यांची मदत होत आहे.तसेच आशा कार्यकर्ती म्हणून निता बनसोडे,रफत तांबोळी यांचा सहभाग आहे.