मांजरीबु ग्रामपंचायतीने गावकर्यासाठी प्राणवायूयुक्त 100 खाटांचे कोविड रुग्नालय ऊभे करावे अनेक रुग्नांचे जीव वाचतील तर गावचे सरपंच व सदस्यां चे कार्य भविष्यात सोनेरी अक्षरात नोंदवले जाईल..

चालू घडामोडी महाराष्ट्र विशेष लेख
Share now
Advertisement

लोकहित न्यूज ,पुणे.दि.19/4/2021

लेखक नितीन जाधव
मंञालय मुख्य संपर्क प्रमुख
महाराष्ट्र राज्य मराठी पञकार संघ , मुंबई ..मो,9326398001

सबंध राज्यात तसेच आपल्या पुणे शहरात कोरोना रोगामुळे मृत्यू चे तांडव घङत आहे. सरकारी,खासगी यंत्रणा कोरोना रुग्नसंख्येच्या विस्फोटा समोर टिकाव धरु शकत नाही त्यात आॕक्सीजन बेड नाही,रेमडेसिवीर नाही ,व्हेँटीलेटर नाही म्हणून शेकडो रुग्न दगावत आहेत.
जवळपास दीङलाख लोकसंख्या असलेल्या मांजरीबु गावात सुध्दा अनेक कोरोनाग्रस्त रुग्न उपचाराअभावी जगाचा निरोप घेत आहेत. आता वेळ आली आहे मांजरीबु. ग्रामपंचायतीने गावकर्यासाठी प्राणवायूयुक्त 100 खाटांचे कोविड रुग्नालय ऊभे करण्याची व रुग्नांना जीवदान देण्याची . हडपसर पंचक्रोशीत ली मोठी ग्रामपंचायत म्हणून मांजरी चा लौकिक आहे तसेच वार्षिक उत्पन्नाच्या बाबतीत 18 कोटी ची उलाढाल होते .100 खाटासाठी जवळपास एक कोटी निधी अपेक्षित आहे.
सरपंच व सदस्यांनी हे आरोग्य सेवेचे व जीवनदानाचे अवर्णनिय कार्य केले तर येणारा भविष्य काळ त्यांच्या कार्याची सोनेरी अक्षरात नोंद घेईन .
आपणास ही जनसेवेची आरोग्य सेवा देण्याची महत्त्वाची संधी चालून आली आहे.स्थानिक लोकप्रतिनीधीनी गावच्या पुढार्यांनी आपल्या गावातील जनतेला संकट काळात मदत करावीच लागते .
आपणास आपल्या परिसरातील सुसज्ज असे मंगल कार्यालय ,शाळा,काॕलेज ,अथवा रुग्नालयाची ईमारत ताब्यात घ्यावी लागेल त्यात सहज शक्य होणाऱ्या प्राथमिक सुविधा तयार कराव्या व सर्वसाधारण खाटा (साधेबेड) निर्माण करावेत .
सध्याघडीला आॕक्सीजन बेड मिळत नसल्यामुळे अनेक जणांना मृत्युने गाठले आहे. त्यामुळे आपण सर्व साधारण खाटावर आॕक्सीजन काॕन्सन्ट्रेटर यंञाद्वारे प्राणवायू देण्याची व्यवस्था करणार आहोत.प्राणवायूयुक्त खाटा हवेतील प्राणवायू देणारी यंञे आपणास खरेदी करावी लागतील बाजारात 30 ते 40 हजारापर्यंत एका यंञाची किंमत आहे.हे यंञ साध्या खाटावर सहज वापरता येते.माञ रुग्नालयातील खाटावर प्राणवायूयुक्त यंञणा खूपच खर्चीक असते ते शक्य नाही. आॕक्सीजन काॕन्सन्ट्रेटर व्दारे अनेक कोरोना रुग्नांना आॕक्सीजन उपलब्ध होऊन त्यांचा जीव वाचू शकतो त्यामुळे ग्रामपंचायत मार्फत कसलेही राजकारण न करता तमाम गावकरी बांधवासाठी 100 खाटांचे रुग्नालय तात्काळ ऊभे करता येईल…मी एक गावकरी जाणकार मतदार म्हणून माझी संकल्पना आपणा समोर मांडत आहे.यात पक्ष.,संघटना,राजकारण ,भेदभाव कुटनिती चा प्रयोग नाही. गावातील यशस्वी उद्योजक,व्यापारी ,राजकीय नेते स्वखर्चातून सुध्दा समाजाची सेवा करण्यासाठी सदरची योजना कार्यन्वीत करु शकाल व आपल्या गावकर्यांचे ,मिञबांधवांचे ,आप्तेष्टांचे जीव वाचवण्यासाठी मदत होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *