हवेली व दौंड तालुक्यातील दोन्हीही आॕक्सीजन प्लँट राञीच ताब्यात घेतले, तालुक्यातील हाॕस्पीटलला व्यवस्थितपणे समन्वय साधत आॕक्सीजन पुरवठा केला जाईल -विजयकुमार चोबे अप्पर तहसीलदार हवेली

चालू घडामोडी महाराष्ट्र
Share now
Advertisement

दोन्हीही प्लँटच्या ठीकाणी समन्वयासाठी शासनाची टिम तयार काळाबाजार होणार नाही .

लोकहित न्यूज हवेली ,पुणे दि. 22/4/2021

लोणी काळभोर – हवेली तालुक्यातील लोणी काळभोर व दौंड तालुक्यातील यवत येथील ऑक्सिजन प्लँट शासनाच्या ताब्यात घेऊन त्यामध्ये एकूण १० मेट्रिक टन ऑक्सिजन उतरविण्यात आले. पुणे व हवेली तालुका आणि दौंड तालुक्यातील हॉस्पिटलला ऑक्सिजन पुरवण्यात येईल अशी माहिती अप्परतहसिलदार विजयकुमार चौबे यांनी दिली. जिल्ह्यात करोनाची दुसरी लाट सक्रीय असून, दिवसेंदिवस रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. सध्या हवेली व दौंड तालुक्यात मोठ्या प्रमाणावर रुग्ण उपचार घेत आहेत. त्यातील अनेक रुग्णांची प्रकृती अत्यवस्थ आहे. अनेक रुग्णांना ऑक्सिजन बेड मिळत नाही ही वस्तुस्थिती असताना खासगी रुग्णालयातील ऑक्सिजनही नाही.

हवेलीतील ऑक्सिजन पुरविणार्‍या दोन अधिकृत एजन्सी शासनाने ताब्यात घेऊन हवेली तालुक्यातील लोणी काळभोर येेेेथील पुुणे एअरगॅस याठिकाणी ५ मेट्रिक टन उतरविण्यात आले व दौंड तालुक्यातील यवत येथील गुरुदत्त एंटरप्रयजेस या ठिकाणी ५ मेट्रिक टन ऑक्सिजन उतरविण्यात आले.

या ठिकाना वरून हॉस्पिटलला ऑक्सिजन पुरविले जाईल. हे प्लँट देखरेखीखाली शासनाने एक टीम तयार करण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारचा काळा बाजार होणार नाही यांची दक्षता घेतली जाईल. यामुळे अनेक रुग्णालयातील अर्नथ टाळला आहे. त्यावेळी उपजिल्हाधिकारी प्रविण साळुंके, उपजिल्हाधिकारी सचिन बारवकर, हवेली तहसिलदार सुनिल कोळी, दौंड तहसिलदार संजय पाटील, हवेली अप्परतहसिलदार विजयकुमार चौबे, नायबतहसिलदार संजय भोसले आर एन टी अजय गेंगाणे, सहाय्यक संजय टाक यांनी रात्रीच्या वेळी ऑक्सिजन प्लँट ताब्यात घेतल्या चे सांगितले आहे.

हवेली व दौंड तालुक्यात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला. परंतु, रात्रीच ऑक्सिजन हवेली व दौंड तालुक्याला मिळाले आहे. कोणत्याही हॉस्पिटलला ऑक्सिजन कमी पडणार नाही. आमचा चांगला समन्वय आहे. त्यामुळे रुग्णांनी घाबरून जाण्याचे कारण नाही- अप्परतहसिलदार विजयकुमार चौबे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *