परंडा,वाशी चे तालुका प्रमुख सह जिल्हा मुख्य पदाधिकारी मंत्री सावंत यांच्या कार्याला न्याय देऊ शकले नाहीत दुसऱ्या फळीतील अभ्यासू कार्यकर्त्याला संधी मिळण्याचे संकेत.
धाराशिव विशेष प्रतिनिधी.. दि 30/04/2023
मंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या मतदारसंघात यशस्वी योजनांच्या कार्याचा झंझावात सुरू असतानाच बाजार समितीच्या निवडणुका लागल्या त्यात भूम चा विजय वगळता परंडा व वाशी बाजार समितीत सत्ताधारी महायुतीला पराजयाचा सामना करावा लागला. तालुकास्तरीय बाजार समित्याच्या निवडणुकां मध्ये तालुकाप्रमुखासह अन्य पदाधिकाऱ्यांची भूमिका महत्त्वाची समजली जाते. आपल्या नेत्याचे कार्य मतदारांपर्यंत पोहोचवणे, शेतकऱ्यांच्या अडचणींची सोडवणूक करणे. भविष्यातील नवीन अत्यावश्यक योजना चा आराखडा मांडणे महत्त्वाचे असते. प्रामुख्याने परंडा,वाशी येथील तालुकाप्रमुखासह अन्य पदाधिकारी मंत्री डॉ.तानाजी सावंत यांच्या यशस्वी कार्याला न्याय देऊ शकले नाहीत त्यांचे कार्य घरोघरी पोहोचवण्यात कमी पडले असल्याची चर्चा मतदारसंघात पहावयास मिळत आहे.
याचाच जाणकारा मार्फत आढावा घेऊन दुसऱ्या फळीतील अभ्यासू कार्यकर्त्याला मुख्य पदावर संधी मिळण्याचे संकेत मिळत आहेत.
केवळ मंत्री महोदयांच्या दौऱ्यापुरते संपर्कात राहणे. जवळच्या लोकांची कामे करून घेणे. ठराविक गावात निधी आणण्यासाठी मंत्री सावंत यांच्यासमोर लोकांची गर्दी गोळा करणे. विरोधी पक्षातील कार्य करणाऱ्या कार्यकर्त्याला कमी समजण्याची चूक करणे. निवडणुकातील प्राचारा ची रणनीती समजावून न घेणे. सोशल मीडिया च्या वापराचा अभाव ,प्रत्यक्ष भेटीगाठी नसणे. स्थानिक पत्रकारांसोबत संवाद नसणे.
हार तुरे घालून सत्कार स्वीकारणे. केवळ स्वतःच्या प्रसिद्धीपुरते काम करणे अशा अनेक बाबींमुळे महायुती च्या पराजयाला खत पाणी घातले गेले असा आरोप काही कार्यकर्ते करत आहेत.
विशेष म्हणजे परंडा शहरासह ग्रामीण भागाचे जीवनमान उंचावण्यासाठी मंत्री डॉ.तानाजी सावंत यांनी भैरवनाथ साखर कारखान्याची निर्मिती करत विकासाची पायाभरणी करून अनेकांना रोजगार दिले तसेच वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवजलक्रांतीचा अनोखा प्रयोग परंड्यातून सुरू केला.
त्याचप्रमाणे दुर्लक्षित असलेल्या वाशी तालुक्यामध्ये शिवशक्ती साखर कारखाना सुरू करून शेतकऱ्यांच्या प्रगतीसह बाजारपेठेमध्ये विकासाची गंगा निर्माण केली. कृषी उत्पन्न बाजार समितीला मतदान करणारे मतदार हे बहुदा ग्रामीण शेतकरी. ग्रामपंचायत सदस्य छोटे मोठे व्यापारी सोसायटीतील सदस्य असतात ते प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या कृषी व्यवसायासह, साखर कारखान्यांच्या अर्थकारणावरच अवलंबून असतात.
परंडा,वाशी मध्ये मंत्री सावंत यांच्या निर्णायक कार्य कुशलतेमुळे सर्व क्षेत्रांमध्ये सुबत्ता निर्माण केली असून मंत्री स्तरावरून ही अनेक कामे मार्गी लागली आहेत. एवढे सर्व साम्राज्य असूनही आपल्या पॅनलचा बाजार समितीच्या निवडणुकात पराभव झाल्याची खंत आरोग्य मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. तानाजीराव सावंत यांना सतावत आहे.
परंडा,वाशी या ठिकाणी महाआघाडीचा समाधानकारक विजय झाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये बळ निर्माण झाले असून आनंदाचे वातावरण तयार झाले आहे. काही महिन्यांमध्येच येऊ घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये आपण चांगल्या प्रकारचा विजय संपादन करू शकतो असा आत्मविश्वास महाआघाडीच्या नेत्यांमध्ये बळावला आहे.
मंत्री डॉ. तानाजी सावंत हे प्रत्येक गोष्टीचा लेखाजोखा ठेवणारे व भविष्यातील राजकीय दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून परंडा वाशी तालुक्यात पदाधिकाऱ्यांची खांदेपालट करतील व दुसऱ्या फळीतील अभ्यासू कार्यकर्त्याला संधी देतील असा राजकीय जाणकारांचा कयास आहे.
तर मतदारसंघातील महत्त्वाचे शहर असलेल्या
भूम येथील बाजार समिती मा. गटनेते संजय नाना गाढवे व शिवसेना नेते आण्णासाहेब देशमुख तसेच बाळासाहेब पाटील -हाडोंगरीकर यांच्या नेतृत्वात निर्विवाद जिंकल्याबद्दल मंत्री डॉ.तानाजीराव सावंत यांनी त्यांचे विशेष कौतुक केले आहे.
एकंदरीतच परंडा,वाशीमध्ये बाजार समिती निवडणूका मध्ये महायुतीला पराभवाचा फटका सहन करावा लागला यासंबंधीची कारणमिमंसा बैठक आयोजित करून होईल पराभवाचे आत्मचिंतन करावे लागणार आहे.
परंतु मंत्री डॉ. तानाजी सावंत यांची कार्यपद्धती पाहता मुख्य पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी होण्याचे संकेत निश्चित आहेत अशी चर्चा मतदारसंघातील महायुतीचे कार्यकर्ते करताना दिसत आहेत.