धाराशिव जिल्ह्याची प्रगती व दुष्काळमुक्ती पासून सुटका करायची असेल तर मंत्री डॉ. सावंत यांच्या कार्यास बळ हवे . ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख प्रा. गौतम लटके यांचा मंत्री सावंत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश.

चालू घडामोडी पुणे मुंबई राजकीय सांस्कृतिक
Share now
Advertisement

धाराशिव जिल्ह्याची प्रगती व मतदार संघाची दुष्काळ मुक्ती पासून सुटका मंत्री डॉ. सावंतच करू शकतात,ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख प्रा.गौतमजी लटके यांचा मंत्री डॉ.सावंत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश.

लोकहित न्यूज.पुणे प्रतिनिधी. दि 19/03/2023


धाराशिव जिल्ह्याची प्रगती व भूम परांडा वाशी मतदार संघाची दुष्काळ मुक्ती पासून सुटका राज्याचे आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंतच करू शकतात त्यांच्या कार्याला साथ देणे हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा.गौतम लटके यांनी मंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या उपस्थितीत मतदार संघातील कार्यकर्त्या सह शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. धाराशिव जिल्ह्याला प्रगतीपथावर नेण्यासाठी व जनतेचे जीवनमान उंचावण्यासाठी मंत्री डॉ.सावंत विविध लोकोपयोगी उपायोजना सातत्याने राबवत आहेत त्यांचे योगदान जिल्ह्यासाठी अतुलनीय असे आहे, विकासासमोर राजकीय विरोध करणे अयोग्य आहे. या दरम्यान बोलते वेळी प्रा. लटके यांनी सांगितले.

भूम,परंडा, वाशी तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये प्रा.लटके सरांचा मोठा जनसंपर्क असून जि. प. चे सदस्य असताना त्यांनी उत्तम कार्य केले तसेच त्यांची कार्यकर्त्यांची ही मोठी फळी आहे. धाराशिव जिल्ह्यातील कृषी, सामाजिक. शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये ही त्यांनी कार्याचा ठसा उमटवला आहे. प्रा. लटके यांच्या शिवसेना प्रवेशाने मात्र उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला धक्का बसला आहे. प्रा. लटके सरांच्या शिवसेना प्रवेशामुळे मंत्री तानाजी सावंत यांची राजकीय ताकद वाढणार आहे. काही महिन्यांमध्ये येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अर्थातच जिल्हा परिषद.पंचायत समिती निवडणुकांमध्ये प्रा.लटके यांचा करिष्मा चालणार एवढे मात्र निश्चित आहे.
सदरच्या पक्ष प्रवेशा वेळी मंत्री डॉ.तानाजी सावंत यांनी प्रा. लटके यांना पेढा भरवून व भगवी शाल व हार घालून सन्मानपूर्वक स्वागत केले.
या समयी मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत कट्टर समर्थक गटाचे प्रमुख चंद्रकांत सरडे, जिल्हा परिषद माजी सभापती दत्तात्रय मोहिते, परंडा युवा तालुकाध्यक्ष राहुल डोके, जयदेव गोफणे,राहुल भांडवलकर, अप्पासाहेब कारंडे,सुरेश डांगे .यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *