घुले वस्ती मांजरी बु येथे राष्ट्रीय डेंग्यू दिन साजरा.
आरोग्य विभागाचा जागृतीपर उपक्रम
लोकहित न्यूज. दि 17/05/2022
डेंगी हटवा जीवन टिकवा आज दिनांक 16 मे 2022 रोजी घुले वस्ती अंगणवाडी याठिकाणी राष्ट्रीय डेंग्यू दिन साजरा करण्यात आला.
यावेळी आरोग्य सहायक सुलाखे यांनी डेंग्यू विषयी लाभार्थ्यांना माहिती दिली,कोरडा दिवस पाळून परिसर स्वच्छता ठेवणे बाबत आरोग्य शिक्षण दिले यावेळी सीमा काळे तसेच घुले वस्ती अंगणवाडी मदतनीस रोहिणी आटोळे उपस्थित होते.
गप्पी मासे पाळा याविषयी आरोग्य शिक्षण देण्यात आले यावेळी सर्व लाभार्थी यांना डेंग्यू विषयी हस्त पत्रिका वाटण्यात आली एकूण 55 हस्त पत्रिका वाटप करण्यात आल्या.