के. पी. पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट मध्ये पत्रकार दिन साजरा व पत्रकारांना शब्दयोद्धा पुरस्कार प्रदान

चालू घडामोडी पुणे शैक्षणिक सामाजिक
Share now
Advertisement

लोकहित न्यूज पुणे दि 5/01/2023

के. पी. पॅरामेडिकल इन्स्टिट्यूटमध्ये पत्रकार दिन व इन्स्टिट्यूटच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन

पत्रकार दिनानिमित्त के.पी.पॅरामेडिकल इन्स्टिट्यूटमध्ये हडपसरमधील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या पत्रकारांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यासाठी दै. सकाळचे प्रतिनिधी कृष्णकांत कोबल, लोकहित न्यूजचे संपादक तसेच मंत्रालय जनसंपर्क माध्यम प्रतिनिधी व राज्य मराठी पत्रकार संघाचे मुख्य संपर्क प्रमुख नितीन जाधव, रॉयल मिडियाचे संपादक तुकाराम गोडसे, दै. पुढारीचे प्रतिनिधी प्रमोद गिरी, आपली चळवळचे संपादक गोरक्ष गायकवाड आणि आपली चळवळ मिडियाचे पत्रकार पितांबर धिवार उपस्थित होते.

उपस्थित सर्व पत्रकारांना उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल के.पी. पॅरामेडिकल इन्स्टिट्यूटच्यावतीने शब्दयोध्दा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या पुरस्काराचे वितरण डॉ. के. टी. पलूसकर चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष ॲड. कृपाल पलूसकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी के. पी. पॅरामेडिकल इन्स्टिट्युटच्या दिनदर्शिकेचे ही पत्रकारांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पत्रकार कृष्णकांत कोबल होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून नितीन जाधव यांनी दर्पण दिनाचे महत्त्व सांगत सखोल भाषण केले , पितांबर धिवार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रास्ताविक ॲड. कृपाल पलूसकर यांनी केले. कार्यक्रमाच्या नियोजनासाठी प्रा. ताबिना शेख, प्रशांत अडसूळ यांनी परिश्रम घेतले. यावेळी प्राचार्या प्रीती कदम, प्रा. किरण कुंभार, प्रा. संदीप मेमाणे, पूजा भाडळे, स्वाती जाधव, ऐश्वर्या खैरे, कोमल मुळीक, शिक्षकवृंद आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन नवनाथ मगर आणि मनीषा ओहाळ यांनी तर आभार प्राचार्या प्रीती कदम यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *