लोकहित न्यूज ,पालघर..दि.29/10/2021
नालासोपरा,वसई,विरार येथे दक्षता जनजागृती सप्ताह कार्यक्रम आयोजित केला त्या वेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने थेट संपर्क करण्याचे आवाहन केले .

दक्षता जनजागृती सप्ताहा निमित्त नालासोपारा वसई, विरार येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन
शासकीय कार्यालया कडून लाचेची मागणी केली तर तात्काळ लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा
लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे
पोलीस उप अधीक्षक नवनाथ जगताप यांचे आवाहन
दक्षता जनजागृती सप्ताहा निमित्त नालासोपारा, वसई, विरार येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमा मध्ये लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे
पोलीस उप अधीक्षक नवनाथ जगताप यांनी जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन केले की कोणताही शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी यांनी शासकीय काम करण्यासाठी लचेची मागणी केलीतर तात्काळ लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा.
दक्षता जनजागृती सप्ताहाच्या अनुषंगाने खालील प्रमाणे कार्यक्रम आयोजित करण्यात आले.
नालासोपारा, वसई, विरार येथील विविध विभागाच्या शासकीय कार्यालयाच्या दर्शनी भागावर एसीबी चे स्टिकर लावण्यात आले. तसेच नागरिकांना एसीबी ची पत्रके वाटून जनजागृती करण्यात आली
रिजन्सी हॉल, नालासोपारा पश्चिम येथे रिक्षाचालक, ग्रामस्थ व पत्रकार यांची कोविड १९ चे नियमांचे पालन करून बैठक घेण्यात आली. संबंधितांना एसीबी ची कार्यपद्धतीची माहिती देऊन जनजागृती करण्यात आली.
विरार पश्चिम येथील विष्णू प्रतिभा सभागृह येथे व्यापारी संघटना विरार यांची कॉर्नर बैठका घेऊन उपस्थितांना एसीबीच्या कार्यपद्धतीची माहिती देऊन जनजागृती करण्यात आली. तसेच कोणी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास एसीबी कार्यालयात तक्रार देण्याबाबत उपस्थितांना आवाहन करण्यात आले.
पालघर जिल्ह्यातील सर्व नागरीकांना पोलिस उप अधीक्षक नवनाथ जगताप यांनी आवाहन केले की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी,कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम (एजेंट) कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ खालील क्रमांकावर संपर्क साधावा.
अँन्टी करप्शन ब्युरो,ठाणे, कॅम्प पालघर
दुरध्वनी 02525-297297*
पोलिस उप अधीक्षक नवनाथ जगताप
मोबा 9923346810/ 9850158810
पोलीस निरीक्षक स्वपन बिश्वास
मोबा 8007290944/9405722011