राष्ट्रवादीचे युवा प्रदेश सरचिटणीस अजित घुले यांची राष्ट्रवादी युवक काँ.नाशीक जिल्हा प्रभारी पदी निवड

चालू घडामोडी महाराष्ट्र राजकीय
Share now
Advertisement

लोकहित न्यूज ,पुणे दि.13/11/2021

राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश सरचिटणीस अजित घुले यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस नाशीक जिल्हा प्रभारी पदी निवड झाली आहे.अजित घुले हे महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश घुले यांचे पुतणे असून अनेक वर्षापासून समाजसेवेचे कार्य करत आहेत तसेच राष्ट्रवादी काँ पक्षाचा कार्यकर्ता म्हणून त्यांनी सुरुवात केली होती व पुणेस्थित मांजरी परिसरात पक्षाच्या माध्यमातून नानाविध उपक्रम राबविले व युवकांची फळी निर्माण केली .अनेक विषयात तरबेज असलेले अजित घुले हे सर्वसमावेशक व्यक्तीमत्व असल्यामुळे तसेच उच्चशिक्षित असल्याने पक्षाकडून त्यांची थेट राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली.त्यानंतर त्यांनी सुरेश घुले यांच्या छञछायेखाली व आमदार चेतन तुपे यांच्या मार्गदर्शनाखाली मांजरी,हडपसर मतदारसंघात पक्षाच्या वतीने कामाचा झपाटा सुरु केला त्याला भरभरुन प्रतिसाद मिळाला .अनेक सण,समारंभ असो की शालेय,सांस्कृतिक ,सामाजिक ,आरोग्यविषयक मदत, क्रिडा ,लोकाभिमुख कार्यक्रम यात कायमचे सातत्य ठेवले.परिणामी त्यांची कार्यशैली ची वेगळी ओळख निर्माण झाली .

दरम्यान कामाचा व्याप वाढल्यामुळे मांजरी केशवनगर रस्त्यालगत सुसज्ज अस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नूतन कार्यालय खुल केल तेव्हा मंञी जयंत पाटील, खुद्द उपमुख्यमंञी अजितदादा पवार यांनी अजित घुले यांच्या कार्याचे मनापासून कौतुक केले होते .अजित यांनी आपले कार्य हीच ओळख संकल्पना रुजवली त्यामुळे पक्षश्रेष्ठीनी अजित घुले यांचे वर आणखी एक मोठी जबाबदारी सोपवली.त्यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस नाशीक जिल्हा प्रभारी पदी निवड झाली.अजित घुले यांचेवर मांजरी,हडपसर,पुणे ,नाशीक परिसरातून शुभेच्छांचा वर्षाव सुरु आहे व त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ,उपमुख्यमंञी अजितदादा पवार ,युवा प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख तसेच सर्व वरिष्ठ पदाधिकारी यांचे अजित घुले यांनी आभार मानले असून जास्तीचे नियोजनबध्द पक्षकार्य करण्याचा मानस केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *