जागतिक अपंग दिनानिमित्त जनाधार दिव्यांग चॕरिटेबल ट्रस्टद्वारे विविध कार्यक्रम संपन्न जि.प.मु.कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांचे मार्गदर्शन

चालू घडामोडी सामाजिक
Share now
Advertisement

संस्था अध्यक्ष दत्ताञय ननवरे यांच्या कार्याला मिळतोय पाठींबा दिव्यांग बांधवाची मोट बांधून शासकीय योजना ,दिव्यांगांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी कटीबध्द असल्याचे मत प्रसार माध्यमाशी बोलताना व्यक्त केले

लोकहित न्यूज ,पुणे दि.3/11/2021

जागतिक अपंग दिनानिमित्त मांजरी येथे जनाधार दिव्यांग चारिटेबल ट्रस्टच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन ‌ ..

जनाधार दिव्यांग चारिटेबल ट्रस्टच्या वतीने मांजरी येथे जागतिक अपंग दिनाचे औचित्य साधून विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून पुणे जिल्हा परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद,जि.प सदस्य दिलीप घुले , कात्रज दुध संघाचे संचालक गोपाळ राव म्हस्के , किसान मंचाचे ज्ञानेश्वर घुले, पंचायत समिती सदस्य जितीन कांबळे मांजरी ग्रामपंचायत माजी उपसरपंच अमित घुले राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे राज्य सचिव अजित घुले माजी ग्रामपंचायत सदस्य कैलास घुले , निलेश घुले, सुमित घुले , बालाजी अंकुश , प्रा सुवर्णा गोरे, मांजरी खुर्द सरपंच स्वप्निल उंदरे पोलिस पाटील अमोल भोसले , आई साहेब प्रतिष्ठान चे बाळासाहेब भोसले पत्रकार कृष्णकांत कोबल , शैलेश बेल्हेकर , पञकार शिवराम कांबळे , पञकार नितीन जाधव ,कृपाल पलुस्कर ,आर पी आय चे बाबा मोरे आदी मान्यवर उपस्थित होते. ‌. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जनाधार दिव्यांग चारिटेबल ट्रस्टच्या अध्यक्ष दत्तात्रय ननवरे हे होते सकाळी १० वाजता दिव्यांग बांधवांच्या प्रभात फेरीने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली उपस्थित सर्व दिव्यांग बांधवांचे मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली त्याच बरोबर आपल्या अपंगत्वावर मात करून आपल्या क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सागर पुजारी , प्रविण डिंबळे , ज्योती राम यादव, धर्मेंद्र सातव , अनिल दाईंगडे आदी दिव्यांग मान्यवरांचा सन्मान जि प चे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन करण्यात आला त्यानंतर आयुश प्रसाद यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले त्यावेळी ते म्हणाले की पुणे येथे लवकरच उत्कृष्ट प्रकारचे दिव्यांग भवन बनविण्यात येणार असून येणाऱ्या काळात अनेक दिव्यागाना त्याचा फायदा होईल तसेच दिव्यांग बांधवांन साठी असणाऱ्या सर्व शासकीय योजनेचा फायदा दिव्यांग बांधवांनी घ्यावा. अपंगत्वाचे खोटे प्रमाणपत्र काढून शासनाची आणि प्रशासनाची दिशाभूल करुन फायदा लाटणारे लोकांन वरील कायदेशीर कारवाई केली जाईल असे सांगितले. महानगर पालिकेत समावेश झालेल्या कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधत असताना त्यांनी सांगितले की जे खरया अर्थाने ग्रामपंचायतीचे कामगार आहेत त्या कोणावरही अन्याय होणार नाही यासह माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप घुले, गोपाळ राव म्हस्के, अमित घुले,जितीन कांबळे, पत्रकार कृष्णकांत कोबल , शैलेश बेल्हेकर , प्रा सुवर्णा गोरे यांनी ही आपल्या भाषणातून संस्थेच्या कार्याचे कौतुक करुन जागतिक अपंग दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष दत्तात्रय ननवरे यांनी अध्यक्ष भाषणात ट्रस्ट ने केलेल्या कार्याचा आढावा उपस्थितांन समोर मांडुन दिव्यांगाचया न्याय हक्कासाठी प्रमाणिक पणे काम करणार असुन वेळ प्रसंगी लोकशाही मार्गाने दिव्यांगांचया विविध प्रश्नांसाठी आंदोलन करण्याची वेळ आली तरी ते करु मात्र दिव्यांग बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी अविरतपणे ट्रस्टच्या माध्यमातून काम करणार असल्याचे सांगितले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवराम कांबळे यांनी तर आभार प्रदर्शन ज्ञानेश्वर घुले यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *