गृहमंञी,कृषीमंञी,अन्न नागरीपुरवठा मंञी व अल्पसंख्यांक मंञी यांनी पञकार संघाच्या, ठाणे अधिवेशनाला दिल्या शुभेच्छा.

चालू घडामोडी मुंबई राजकीय
Share now
Advertisement

महाराष्ट्र राज्य मराठी पञकार संघाचे मंञालय मुख्य संपर्क प्रमुख नितीन जाधव यांनी मंञालयात विविध मंञ्यासोबत संवाद साधत पञकार संघाच्या 28 डिसेंबर रोजी ठाणे येथे होणाऱ्या अधिवेशनाचे निमंत्रण पञ दिले .

गृहमंत्री दिलीप वळसेपाटील यांना निमंत्रण पञ देताना नितीन जाधव

लोकहित न्यूज,मंञालय मुंबई दि.14/12/2021

महाराष्ट्र राज्य मराठी पञकार संघाचे 16 वे राज्य स्तरीय अधिवेशन ठाणे येथिल गडकरी रंगायतन येथे संपन्न होणार आहे.या अधिवेशनाला विशेषउपस्थिती म्हणून काही मंञ्यांना निमंत्रण देण्यात आले आहे. या वेळी मंञालयीन मुख्य संपर्क प्रमुख नितीन जाधव यांनी गृहमंञी दिलीप वळसे पाटील ,कृषीमंञी दादाजी भुसे ,अन्न व नागरीपुरवठा मंञी छगन भुजबळ तसेच अल्पसंख्यांक ,कौशल्य व उद्योजकता मंञी नवाब मलीक यांची मंञी कार्यालयात भेट घेतली व अधिवेशनाचे निमंत्रण पञ दिले. या भेटी दरम्यान मंत्री महोदयांनी पञकार संघाच्या कार्या संदर्भात दिलखुलास चर्चा केली व अधिवेशनाला मनापासून शुभेच्छा दिल्या.

अल्पसंख्यांक मंञी नवाब मलीक यांनी संघाचे संपर्क प्रमुख नितीन जाधव यांचेशी बातचित करत असताना पञकार संघाच्या कार्याला व अधिवेशनाला दिल्या शुभेच्छा पहा व्हीडीओ..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *