महाव्यवस्थापक लालवाणी यांनी सकारात्मकता दर्शवल्याचे सल्लागार समिती सदस्य कृपाल पलूस्कर यांनी माध्यमाला सांगितले
लोकहित न्यूज, पुणे. दि 6/10/2023
१२४व्या क्षेत्रीय रेल्वे वापरकर्त्यांच्या सल्लागार समितीची (ZRUCC) बैठक महाव्यवस्थापक मध्य रेल्वे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न
नरेश लालवानी, महाव्यवस्थापक, मध्य रेल्वे यांनी दि. ४.१०.२०२३ रोजी १२४व्या क्षेत्रीय रेल्वे वापरकर्त्यांच्या सल्लागार समितीची (ZRUCC) बैठक मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथील सभागृहात घेतली. अरविंद सावंत, खासदार (लोकसभा), मुंबई (दक्षिण) मतदारसंघ, धनंजय महाडिक, खासदार (राज्यसभा), कोल्हापूर (दक्षिण) मतदारसंघ आणि डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी, सोलापूर (लोकसभा) मतदारसंघाचे खासदार, तसेच मध्य रेल्वे सल्लागार समिती सदस्य ऍड. कृपाल पलूसकर व महाराष्ट्र, मध्य प्रदेश, कर्नाटक राज्यातील इतर क्षेत्रीय रेल्वे वापरकर्त्यांच्या सल्लागार समितीच्या (ZRUCC) ३९ सदस्यांसह उपस्थित होते.
बैठकीला संबोधित करताना नरेश लालवानी म्हणाले की, क्षेत्रीय रेल्वे वापरकर्त्यांच्या सल्लागार समितीची (ZRUCC) सदस्यांच्या सूचनांना महत्त्व आहे आणि रेल्वेला प्रवाशांसाठी तिची सेवा अधिक चांगली करण्यास मदत होते. ते म्हणाले की, मध्य रेल्वेने २०२२-२३ या आर्थिक वर्षात भाडे-व्यतिरीक्त (नॉन-फेअर) महसूल आणि तिकीट तपासणी महसूलाच्या बाबतीत आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी केली आहे.
ते पुढे म्हणाले की, मध्य रेल्वेने २०२२-२३ या आर्थिक वर्षात ८१.८४ दशलक्ष टन विक्रमी मालवाहतूक नोंदवली आहे आणि २०२३-२४ या वर्षात आतापर्यंत ३५.८८ दशलक्ष टनांचे उत्साहवर्धक लोडिंग नोंदवले आहे.
तसेच , २५८ किलोमीटर नवीन लाईन टाकणे आणि लाईनचे दुहेरीकरण आणि मल्टीट्रॅकिंग यासारख्या पायाभूत सुविधांचे काम पूर्ण झाले आहे. आर्थिक वर्षात ८ एस्केलेटर, ८ लिफ्ट जोडण्यात आल्या असून मध्य रेल्वेवर एकूण १७४ एस्केलेटर आणि१३७ लिफ्ट आहेत. मध्य रेल्वेने चालू आर्थिक वर्षात आणखी १८ एस्केलेटर आणि आणखी २५ लिफ्ट बसवण्याची योजना आखली आहे. अमृत भारत स्टेशन प्रकल्पांतर्गत स्थानकांच्या पुनर्विकासाचा भाग म्हणून मध्य रेल्वे वर ९५ एस्केलेटर आणि ११४ लिफ्ट बसवण्याची योजना आहे.
सुरक्षेवर बोलताना लालवानी म्हणाले, ३११ डब्यांमध्ये १९२४ सीसीटीव्ही कॅमेरे बसवून सुरक्षिततेच्या चांगल्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. याशिवाय वंदे भारत ट्रेन, डेमू (DEMU) , मेमू (MEMU) आणि एलएचबी LHB) डब्यांच्या ३६४ डब्यांमध्ये २१३२ सीसीटीव्ही कॅमेरे प्रदान करण्यात आले आहेत. ८१ ईएमयू (EMU) रेकच्या महिला डब्यांमध्ये यंत्रणा बसवण्यात आली आहे. ५९ स्थानकांवर वन स्टेशन वन प्रॉडक्ट स्टॉल्स आणि उर्जेची बचत करण्यासाठी ९२ स्थानकांवर सौर पॅनेल सुरू करणे ही देखील मध्य रेल्वेची काही मोठी कामगिरी आहे, असेही त्यांनी नमूद केले.
मध्य रेल्वे वापरकर्त्यांच्या सल्लागार समितीच्या (ZRUCC) सदस्य ऍड. कृपाल पलूसकर यांनी खालील प्रश्नावर चर्चा केली
● दौंड हे पुण्याचे उपनगर म्हणून कार्यान्वित करावे यावर महाव्यवस्थापकांनी नमूद केले की सदर प्रस्ताव मंजूर झाला असून लवकरच याची अमलबजावणी चे आदेश जारी करण्यात येतील.
● दौंड पुणे लोकल तसेच पुणे सातारा लोकल गाडी पुण्यापर्यंत जास्त प्रमानात चालू करावी जेणे करून students, worker यांच्या समस्या समजून यावर मार्ग निघ्यावा, यावर महाव्यवस्थापकांनी यावर वेळे चे नियोजन च परीक्षण करून वेळेबाबत निर्णय घेण्यात मार्च -एप्रिल पर्यंत दुहेरी मार्ग होईल व त्या नंतर निर्णय घेण्यात येईल असे सांगितले.
●हडपसर स्थानकात हैद्राबाद एक्स्प्रेस या गाडीला थांबा हा प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वरून तो प्लॅटफॉर्म क्रमांक 1 करावा जेणे करून गर्भावती महिला, दिव्यांगं बांधव ह्यांना ते सोयसकार पडेल तसेच त्यांना एक्ससेलटर, लिफ्ट आश्या सुविद्या मिळावी, यावर महाव्यवस्थापकांनी हडपसर स्थानकाचा अमृत भारत स्टेशन अंतर्गत सकारात्मक विचार व परीक्षण करून निर्णय घेण्यात आला आहे असे सांगितले
● तसेच पुणे – सोलापूर Demu ट्रेन क्रमांक 11421/11422 हि demu ट्रेन मांजरी बुद्रुक ह्या स्टेशन ला थांबा मिळावा, या बाबत सकारात्मक चर्चा झाली व 3 महिने चा अवधी ची वेळ त्यांनी मागुन घेतली, त्यावर योग्य तो विचार करून महाव्यवस्थापकांनी या थांबा मंजूर मिळाली असे सांगितले.
तसेच महाव्यवस्थापकांनी सदस्यांना आश्वासन दिले की, मध्य रेल्वेने सदस्यांच्या सूचनांचे परीक्षण केले आहे आणि त्यावर सविस्तर विचारविनिमय केल्यानंतर देण्यात आलेल्या विविध सूचनांची अंमलबजावणी करण्याचे आश्वासन दिले.
या बैठकीला मध्य रेल्वेचे प्रधान विभागप्रमुख आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.