लोकहीत न्यूज नेटवर्क
जालना.
दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर अनेक ठीकाणी गृहप्रकल्प सुरु झाले आहेत .बांधकामासाठी सळई ,स्टील मोठ्या प्रमाणात वापरावे लागते त्यामुळे नविन प्रकल्पाची सुरुवात जोरकसपणे झाल्याने स्टीलची मागणी अचानक वाढल्याचे चिञ आहे.कोरोनामुळे अडचणीत सापडलेल्या स्टील उद्योगाला सध्या भरारी मिळत आहे.एका बाजूला स्टीलची मागणी वाढली तर दुसरीकडे कच्चा माल व स्क्रॕप पुरवठा घटल्यामुळे या उद्योगाला अडचण जाणवत आहे.
याच कारणामुळे सध्या स्टील उद्योजकांनी दरात वाढ केल्याचे बोलले जाते.जालना हे देशातील स्टील उत्पादन करणारे प्रमुख केंद्र बनले आहे.मध्यंतरीच्या काळात जालना येथिल सर्व कारखाने दोन महीने बंद होते .सध्यास्थितीला हे कारखाने पुन्हा सुरु झाले आहेत माञ कच्चा मालाचा तुटवडा भासत असल्यामुळे उत्पादन घटले आहे.
याठीकाणी चीनमधून मोठ्या प्रमाणात स्क्रॕप चा पुरवठा होतो सदरचा पुरवठा कमी झाल्याने या उद्योगाची मोठी अङचण झाली आहे.जालन्यात स्टीलचे दहा मेगा प्रोजेक्ट असून 21 हून अधिक रि रोलींग मिल कार्यरत असल्यामुळे जवळपास 25 हजार लोकांच्या हाताला रोजगार उपलब्ध झाला आहे.