मांजरीबु गावात एटीएम मध्ये खडखडाट असल्यामुळे ग्राहक मेटाकुटीला.

Advertisement

मांजरीबु गावातील एटीएम सेंटर नावालाच नेहमीच असतो खडखडाट ग्राहकांना मनस्ताप

मांजरीबु वार्ताहर दि.2 मार्च 2021

मांजरीबु गावातील अॕक्सीस बँक,एचडीएफसी बँक,इंडीकॕश एटीएम सेंटर नावालाच आहेत का ? नेहमीच येथे खडखडाट पहावयास मिळतो यामुळे सामान्यासह ,नोकरदार ,व्यापारी ,दुकानदार असलेल्या ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. मांजरीबु गावात नागरीकरण मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे लोकसंख्येत ही सातत्याने वाढ होत आहे.तसेच पुणेजिल्हा शिक्षण मंडाळाचे अद्यावत ईंजीनिअरिंग महाविद्यालय,व्हीएसआय ,प्रख्यात कल्याणी शाळा ,रयत शिक्षण संस्थेचे घुले विद्यालय ,मध्यम स्वरुपाची वाढती गृहसंकुले यासह छोटे मोठे विविध क्षेत्रातील लघु उद्योग आकार घेत आहेत.
यामुळे मांजरी बु येथे व्यवसायाची संधी हेरत आघाडीच्या बँकांनी काही वर्षापूर्वी येथे एटीएम सेंटर सुरु केली . आज घडीला मांजरीबु येथिल ईंजिनिअरिंग महाविद्यालय समोरील एचडीएफसी व ईंडीकॕश बँकेचे एटीएम मध्ये नेहमीच खडखडाट असल्याचे दिसते तर ईंडीकॕश चे मशीन नादुरुस्त आहे
शिवाय येथे सुरक्षा रक्षक ही ड्युटी वर नसतात व सेंटर मध्ये अस्वच्छतेसह कचर्याचे साम्राज्य असते तसेच साईकाॕर्नर गवळीवस्ती येथिल अॕक्सीस बँकेच्या एटीएम मध्ये पैसे च उपलब्ध नसतात या सर्व बाबीमुळे ग्राहकांची धावपळ होत असून मानसीक ञास होत असल्याचे नागरिक सांगत आहेत.
गावातील ग्राहकांना व्यस्थित सेवा देण्यास सदरच्या बँका असमर्थ ठरत असून ही एटीएम केंदे नावालाच शोभेलाच आहेत की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.तथापि बँकेच्या व्यवस्थापकांनी मांजरीबु गावातील एटीएम सेंटर सुरुळीतपणे व सुसज्जपणे चालावित यासाठी जातीने लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.