शरद पवार यांचे आदेशान्वये राष्ट्रवादी काँ.पक्षाच्या आवाहनाला प्रतिसाद देत कै.अजिंक्य घुले यांचे स्मरणार्थ युवा प्रदेश सरचिटणीस अजित घुले यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य रक्तदान शिबीर संपन्न.

चालू घडामोडी राजकीय सामाजिक
Share now
Advertisement

लोकहित न्यूज ,पुणे. दि.30/4/2021

कोरोना संसर्गाच्या काळात रक्ताचा तुटवडा भासत असल्यामुळे काळाची गरज ओळखून मांजरी बुद्रुक मध्ये राष्ट्रवादी युवक कॉग्रेस चे प्रदेश सरचिटणीस अजित घुले यांच्या संकल्पनेतून रक्तदान शिबिर आयोजित केले त्यास उत्तम प्रतिसाद मिळाला व उत्साहात संपन्न झाले.

कोरोनाच्या कठीण प्रसंगात रुग्णांना दिवसेंदिवस रक्ताची गरज भासत आहे.या कठीण परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन,

लोकनेते शरद पवार यांच्या आदेशानुसार,राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन कै. अजिंक्यदादा घुले स्मरणार्थ मांजरी बुद्रुक येथे मेहबूबभाई शेख(अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश युवक कॉग्रेस.),रविकांत वरपे(महाराष्ट्र प्रदेश युवक कार्याध्यक्ष),अजित दत्तात्रय घुले(महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस युवक काँग्रेस,संस्थापक- शारदा सोशल फाउंडेशन) यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान शिबिर मोठ्या उत्साहात पार पडले.
या शिबिरात एकूण 189 रक्तदात्यांनी सहभाग घेतला.या शिबिराला नोबेल हॉस्पिटल ब्लड बँक व पी एस आय ब्लड बँकांनी मदत केली.
मांजरी गाव व आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी यामध्ये सहभाग घेऊन सामजिक बांधिलकी जपण्याचा संदेश दिला.
प्रत्येक रक्तदात्याला मास्क सॅनिटाईजर तसेच वाफेचे मशीन व प्रमाणपत्र देण्यात आले.
कार्यक्रमाचे उदघाटन हडपसर वि. मतदार संघाचे कर्तव्यदक्ष आमदार चेतन तुपे पाटील आणि महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष सुरेश (अण्णा) घुले यांच्या हस्ते करण्यात आले.

या प्रसंगी मा. जि. प. सदस्य शिवाजीमामा खलसे,जितीन कांबळे(पंचायत समिती सदस्य),मा. ग्रा.पं. सदस्य दिलीपदादा टकले, मा. ग्रा.पं. सदस्य सचिन आप्पा टकले,विक्रम शेवाळे,अभिषेक घुले,अनिल तात्या घुले, विनय घुले, गजेंद्र मोरे,प्रकाश जावळे,संजय गायकवाड, माणिक शेट्टी,प्रशांतदादा भंडारी,चंदुआण्णा सुराले,प्रकाश शिंदे,माउली मोरे,तुषार घुले,संतोष घुले,अविनाश गुंडाले,मंगेश जगताप,शैलेश बडदे,मेघराज घाडगे,सिद्धांत घुले, व सर्व सदस्य व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *