शिवसेनेचा आज षण्मुखानंद सभागृहात दसरा मेळावा ,देशाच्या राजकारणाला नवी दिशा देणारा व शिवसैनिकाचे आत्मबल ताकद वाढवणारा ऐतिहासिक मेळावा ,भाजपा चा ठाकरे शैलीत घेणार समाचार

चालू घडामोडी मुंबई राजकीय
Share now
Advertisement

लोकहित न्यूज ,मुंबई दि.15/10/2021

शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे आज सायंकाळी होणाऱ्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात काय बोलतात याकडे राज्यासह ,देशाचे लक्ष लागले आहे.सुमारे 1200 जणांच्या उपस्थिती त सदरचा दसरा मेळावा होणार आहे.भाजपाच्या राज्यातील नेत्यांनी ठाकरे सरकार वर अनेक दिवासापासून आरोपांची राळ उठवली असून ईडी कडून अनेक बड्या मंञ्याची होत असलेली चौकशी ,लखीमपूर मधील शेतकरी कांड ,आताचा महाराष्ट्र बंद ,तसेच महाआघाडी सरकार वरील वाढती कटकारस्थाने याबाबत पक्षप्रमुख ठाकरे खरपूस समाचार घेतील तसेच मुंबई महापालीकेसह ,ईतर होऊ घातलेल्या महापालीकेच्या तयारी ला लागण्यासंदर्भातील कानमंञ शिवसैनिकांना देतील.तसेच राष्ट्रीय राजकारण,पंतप्रधान मोदीजी ,भाजपा चे कुटील राजकारणावर तुफानी ठाकरे शैलीत हल्ला चढवतील अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.त्याच बरोबर शिवसेनेचे संपूर्ण महाराष्ट्रात वैयक्तिक ताकद वाढविण्यासाठी शिवसैनिकांना संदेश देतील प्रसंगी स्वबळावर सुध्दा आरुढ होण्याची तयारी विषयी भाष्य करतील व शिवसैनिकात नवचैतन्य निर्माण करतील .आजचा दसरा मेळावा अनेक अर्थाने ऐतिहासिक व राष्ट्रीय राजकारणाला नवी दिशा देणारा ठरणार..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *