पावसाळी अधिवेशनात संसदेच्या दोन्ही सभागृहात 9 विधेयके मंजूर

चालू घडामोडी मुंबई
Share now
Advertisement

लोकहित न्यूज ,मुंबई दि.6/07/2021

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात 9 विधेयके मंजूर
 
विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन – 2021 आज संस्थगित झाले. या दोन दिवसांच्या अधिवेशनात मांडण्यात आलेली विधेयके आणि त्याबाबतचा तपशील पुढील प्रमाणे.
 
दोन्ही सभागृहात संमत विधेयके 9

 
संमत विधेयके

(1)          सन 2021 चे महाराष्ट्र विधान सभा विधेयक क्र. 8.- महाराष्ट्र (नागरी क्षेत्रे) झाडांचे संरक्षण व जतन (सुधारणा) विधेयक, 2021 (पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग) (हेरिटेज ट्री (प्राचीन वृक्ष) यांच्या संरक्षणासाठी आवश्यक कृतीकार्यक्रम राबविण्याकरिता तरतूद व महाराष्ट्र राज्य वृक्ष प्राधिकरणाची स्थापना
(2)          सन 2021 चे महाराष्ट्र विधान सभा विधेयक क्र. 9.-  महाराष्ट्र परगणा व कुळकर्णी वतने नाहीशी करण्याबाबत, महाराष्ट्र (समाजास उपयुक्त) सेवा इनामे रद्द करण्याबाबत, महाराष्ट्र विलीन प्रदेश किरकोळ दुमाला वहिवाटी नाहीशा करण्याबाबत, महाराष्ट्र गावची कनिष्ठ वतने नाहीशी करण्याबाबत आणि महाराष्ट्र मुलकी पाटील (पद रद्द करणे) (सुधारणा) विधेयक, 2021 (महसुल व वने विभाग) (इनाम आणि वतन जमिनींवरील गुंठेवारी नियमाधीन करताना, इनाम व वतने रद्द करण्याबाबतच्या अधिनियमांन्वये अनर्जित उत्पन्नाची व द्रव्य वसूल केल्या जाणाऱ्या द्रव्यदंडाची रक्कम कमी करण्याची मागणी आहे.  म्हणून, शासनास, अशा इनाम किंवा वतन जमिनीवरील गुंठेवारी नियमाधीन करताना, अर्नजित उत्पन्नाची एकुण रक्कम आणि द्रव्यदंडाची रक्कम वार्षिक दर विवरणपत्रानुसार, अशा इनाम किंवा वतन जमिनीच्या मूल्याच्या पंचवीस टक्के इतकी कमी करण्यासाठी तरतूद करण्याबाबतचे विधेयक.
(3)          सन 2021 चे महाराष्ट्र विधान सभा विधेयक क्र 10. महाराष्ट्र सहकारी संस्था (सुधारणा) विधेयक, 2021 (सहकार, वस्त्रद्योग व पणन विभाग) (कोरोनाच्या पार्श्वभूमीमुळे संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडलेल्या नसल्यामुळे बरेच सभासद अक्रियाशील होण्याची शक्यता आहे.  हे टाळण्यासाठी अधिनियमाच्या कलम 26 व 27 मध्ये सुधारणा करण्यात आली.
(4)         सन 2021 चे महाराष्ट्र विधान सभा विधेयक क्र. 11.- महाराष्ट्र परिचारीका (सुधारणा) विधेयक, 2021 (महाराष्ट्र परिचर्या परिषदेवर नियुक्त करण्यात आलेल्या प्रशासकाची मुदत दिनांक 19.12.2020 रोजी संपुष्टात आली असल्याने आणि परिषदेचे दैनंदिन कामकाज सुरळीत चालण्यासाठी व परिषदेची निवडणूक घेण्यासाठी प्रशासकाला पूर्वलक्षी प्रभावाने मुदतवाढ देणे आवश्यक असल्याने महाराष्ट्र परिचारिका अधिनियम, 1966 याच्या कलम 40 च्या पोट-कलम (३) मध्ये परंतुक जादा दाखल करणे तसेच प्रशासकाने दि. 19.12.2020 पासून परिषदेच्या कामकाजाबाबत घेतलेले निर्णय, घटना व कृती यांना कायदेशीर संरक्षण देण्याकरीता तरतूद  करण्यात आली.
(5)         सन 2021 चे महाराष्ट्र विधान सभा विधेयक क्र. 12.- महाराष्ट्र वस्तू व सेवा कर (सुधारणा) विधेयक, 2021 (वित्त विभाग) संमत.
(6)          सन 2021 चे महाराष्ट्र विधान सभा विधेयक क्र. 13.- महाराष्ट्र राजभाषा (सुधारणा)विधेयक, 2021 (मराठी भाषा विभाग) संमत.
(7)         सन 2021 चे महाराष्ट्र विधान सभा विधेयक क्र. 14.- महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ (सुधारणा) विधेयक, 2021 (उच्च व तंत्र शिक्षण विभाग) (नविन महाविद्यालय किंवा परिसंस्था सुरू करण्यास अंतिम मान्यता देण्याचा व अनुपालन अहवाल पाठविण्याचा दिनांक वाढविण्याबाबतची बाब संमत.
(8)         सन 2021 चे महाराष्ट्र विधान सभा विधेयक क्र. 15.- ॲटलस स्किलटेक  विद्यापीठ, मुंबई विधेयक, 2021 (कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग) (राज्यामध्ये स्वयंअर्थसहाय्यित कौशल्य विद्यापीठ स्थापन करण्याचे विधेयक संमत.
(9)          सन 2021 चे विधानसभा विधेयक क्रमांक 16- महाराष्ट्र (द्वितीय पुरवणी) विनियोजन विधेयक, 2021. 
 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *