चैत्यभूमी ही आम्हा सर्वांचीच ऊर्जास्ञोत आहे ,इथली माती आम्हाला नेहमीच ऊर्जा देत राहील-जयंत पाटील

मुंबई सामाजिक
Share now
Advertisement

लोकहित न्यूज ,मुंबई दि.6डिसेंबर 2020

चैत्यभूमी ही आम्हा सर्वांचीच उर्जास्त्रोत आहे… इथली माती आम्हाला नेहमीच उर्जा देत राहील – जयंत पाटील

#LetterToAmbedkar : मोहिमेनुसार मंत्री जयंत पाटील यांचे बाबासाहेबांना पत्राद्वारे अभिवादन !

चैत्यभूमी ही आम्हा सर्वांचीच उर्जास्त्रोत आहे… इथली माती आम्हाला नेहमीच उर्जा देत राहील असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेबांना पत्र लिहून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज अभिवादन केले आहे.

महाविकास आघाडी रंजल्या गांजलेल्यांच्या उन्नतीसाठी काम करणार असून कितीही हल्ले झाले तरी समता, न्याय, बंधुता या मुल्यांचं रक्षण करणार असल्याचे जयंत पाटील यांनी या पत्रात म्हटले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिनी घरूनच बाबासाहेबांना अभिवादन करण्याचे आवाहन राज्य सरकारने केले होते. त्याच अनुषंगाने आंबेडकरी अनुयायांतर्फे #LetterToAmbedkar ही मोहीम राबवली जात आहे. ज्यात प्रत्यक्ष चैत्यभूमीवर न जाता चैत्यभूमीच्या पत्त्यावर पत्र पाठवून अभिवादन केले जाणार होते. याच मोहिमेचा भाग होत स्वतः जयंत पाटील यांनी पत्र लिहून या मोहिमेत सहभाग घेतला आहे.

जयंत पाटील यांनी आपल्या पत्रात प्रिय बाबासाहेब, देशभरातील कोविडचे संकट कमी झाले नसल्याने यंदा आम्ही घरूनच आपल्याला अभिवादन करत आहोत. तुम्ही घालून दिलेल्या विचारांचं आजही आम्ही पालन करत आहोत म्हणून देशहितासाठी आपल्या महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवर गर्दी न करण्याच्या सरकारच्या आवाहनाला पाठिंबा दिला आहे.

आमचे सरकार संत गाडगेबाबांच्या विचारांना प्रेरित होऊन इथल्या रंजल्या गांजलेल्यांच्या उन्नतीसाठी काम करू हे आमचे ध्येय आहे. उपेक्षित, वंचितांच्या प्रगतीसाठी सदैव कार्यरत राहू. महाराष्ट्राला पुरोगामी विचारांचा एक प्रबळ वारसा आहे. या विचारांना तडा जाऊ न देता समता, न्याय, बंधुता या मुल्यांचं आम्ही रक्षण करू असे आश्वासन जयंत पाटील यांनी पत्राद्वारे दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *