patrakar sangh sneh sammelan news

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ भिवंडी महानगर क्षेत्राच्या वतीने संघातील पत्रकारांचे दिवाळी स्नेह संमेलन कार्यक्रम उत्सहात संपन्न

सामाजिक सांस्कृतिक
Share now
Advertisement

पत्रकार बांधवांनी पत्रकार संघाचे नाव बदनाम होईल असे काम करू नये – किशोर पाटील
आपण सर्व पत्रकार एकत्र राहणं, एकत्र विचार करणं गरजेचे – दिनकर गायकवाड

भिवंडी – रमण पंडित

पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेश अध्यक्ष श्री.वसंत मुंडे, राज्य संघटक श्री.संजय भोकरे, राज्य सरचिटणीस श्री.विश्वासराव आरोटे, ठाणे जिल्हाध्यक्ष श्री.भगवान चंदे यांच्या मार्गदर्शना खाली संघाचे भिवंडी महानगर क्षेत्र अध्यक्ष श्री.किशोर बळीराम पाटील यांच्यावतीने संघातील पत्रकारांना दिवाळी भेट देण्यासाठी दिवाळी स्नेह संमेलन २०२० चे आयोजन रविवार दी. २२ नोव्हेंबर २०२० रोजी उत्तर यादव युवा संघ कार्यालय आसबिबी, खदानरोड येथे करण्यात आले होते.


सदर कार्यक्रम भिवंडी महानगर क्षेत्र अध्यक्ष श्री.किशोर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.यावेळी व्यासपीठावर संघाचे पदाधिकारी श्री. दिनकर गायकवाड, श्री. सुरजपाल यादव, श्री. अशोक पाटील व सर्व सदस्य उपस्थित होते.

सर्व प्रथम आपणा सर्वांना दीपावली व येणाऱ्या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या . कारण आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहिले व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले आहे.आपली उपजीविका पत्रकारितेवर अवलंबून असल्यामुळे आपण सर्वांनी चांगले काम केले पाहिजे जेणे करुन आपली बदनामी होता कामा नये.

patrakar sangh sneh sammelan news

तसेच आपल्या कुटुंबावर अचानक एखादा प्रसंग ओढवला तर त्या प्रसंगी पत्रकार संघातील सर्व सदस्य आपल्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहतील.मात्र पत्रकार संघाचे नाव बदनाम होता कामा नये यासाठी आपण सर्वांनी सतर्क राहिले पाहिजे.चांगल काम केल्याने कोणीही पत्रकार असो त्याच्यामागे धावणारे अनेक जण असतात.मी अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे.

व माझ्या नंतर दुसरा कोणीही अध्यक्ष होईल त्याच्या सोबत आपण सर्वांनी राहिले पाहिजे.या ठिकाणी सर्वांना अध्यक्ष होण्याचा अधिकार आहे म्हणून आपण संघासाठी चांगले काम केले पाहिजे.संघाचे वरिष्ठ पदाधिकारी आपल्या कार्याची दखल घेत असतात हे विसरता कामा नये.मी अध्यक्ष आहे म्हणून आज आपण विविध माध्यमातील पत्रकार या संघात जोडले जात आहात व मीसुध्दा वरिष्ठांना सांगुन आपल्याला संघात जोडत आहे.

हा तुमचा मोठे पणा आहे.आपण कोणाकडे गेलो तर स्वतः साठी कधीच काही मागु नका माझ्या छोट्या मोठ्या पत्रकारांना आपल्या कडून काहीतरी मदत मिळावी असे सांगा .यामुळे आपली स्वतःची प्रतिमा दुसऱ्या समोर उजळते.कारण आपण आपल्या सर्व सहकारी वर्गासाठी मागत असतो हे लक्षात ठेवा.

याच मुळे आपल्या पत्रकार संघाचे नाव बदनाम न होता आदराने घेतले जाते असे यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे भिवंडी महानगर क्षेत्र अध्यक्ष श्री.किशोर बळीराम पाटील यांनी सांगितले. गेल्या तीन वर्षांपासून आम्ही पत्रकार संघाचे भिवंडी महानगर क्षेत्रात काम करत आहोत.संघ काय असतो ते या संघात जोडले गेल्या नंतर समजले.कारण संघ म्हणजे कोणी एकटा चालवू शकत नाही.तर त्यासाठी आपण सर्वांनी एकत्र आल पाहिजे एकत्र राहण,एकत्र विचार करणे गरजेचे आहे असे यावेळी श्री.दिनकर गायकवाड यांनी सांगितले

सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन तसेच सर्वांना योग्य विचार,मार्गदर्शन,व कार्यक्रमाचा संपूर्ण लेखा जोखा आपल्या प्रास्ताविकात आचार्य सुरजपाल यादव यांनी उत्तम प्रकारे मांडला.या शुभप्रसंगी जितेंद्र तिवारी, सी.पी.तिवारी, रेहान खान, गुरुप्रसाद सिंह, सोमनाथ ठाकरे, एस.बी. अन्सारी, रवी वर्मा, अमृत शर्मा, श्रीनिवास सिरीमल्ले,

व्यंकटेश रापेल्ली, परवीन खान, मेहंदी हसन, निलम तिवारी, लवलेश सुतार, ताज अन्सारी, रेश्मा ताज अन्सारी, रमण पंडित, शिवम झा, अनिल गजरे, रवी तिवारी, मोहित सिंगल ,जगदीश पताले,वआदी पत्रकार बांधव उपस्थित होते.कार्यक्रमाची सांगता भेट वस्तू व स्नेह भोजनानी झाली.त्यामुळे उपस्थित सर्वांनी संघाचे अध्यक्ष श्री किशोर पाटील यांचे मनापासून आभार मानले….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *