कमालीची उत्सुकता असलेला धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे हा चित्रपट 13 मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला चित्रपटाचा टिझर रिलीज.

चालू घडामोडी मुंबई राजकीय
Share now
Advertisement

धर्मवीर आनंद दिघे यांचा जीवन प्रवास चित्रपटात दिसणार आहे.

लोकहित न्यूज, पुणे.

जनसामान्यांचा नेता नाही तर जनसामान्यांचा आधार अशी कीर्ती असलेले आणि आपली संपूर्ण हयात सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी खर्ची घालणारे ‘लोककारणी’ म्हणजे आनंद दिघे त्यांचा जीवनप्रवास चित्रपटाच्या रुपात लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच यात आनंद दिघे यांची भूमिका कोण साकारणार याबद्दल प्रेक्षकांच्या मनात कमालीची उत्सुकता होती. या प्रश्नाचे उत्तर आता मिळाले असून आनंद दिघेची दमदार व्यक्तिरेखा अभिनेता प्रसाद ओक साकारणार आहे.

प्रवीण विठ्ठल तरडे यांचे दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटाची निर्मिती अभिनेते मंगेश देसाई यांच्या साहिल मोशन आर्ट्स आणि झी स्टुडिओजने केली आहे. आजवर अनेक दर्जेदार आणि एकाहून एक सरस चित्रपट देणाऱ्या झी स्टुडिओजच्या माध्यमातून येत्या 13 मे रोजी ‘धर्मवीर मु.पो. ठाणे’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.  आनंद दिघे यांचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य होतं ते म्हणजे तळागाळातील लोकांचा विचार. गरीब, शोषितांच्या अन्यायाला वाचा फोडणारे आणि जुलूमाची भाषा करणाऱ्यांर आपली जरब बसवणारे हे व्यक्तिमत्व. माणसं जोडण्याची कला त्यांना अवगत होती आणि ही माणसे त्यांनी जोडली ती त्यांच्या कामाच्या माध्यमातून. सामान्य माणसाची कितीही छोटी किंवा कितीही मोठी समस्या असू दे ती सोडवणं हेच त्यांच्या जीवनाचं जणू व्रतच होतं. घरावर तुळशीपत्र ठेवून निघालेल्या, बँकेत अकाउंट नसलेल्या आणि दोन्ही खिसे रिकामे असलेल्या या माणसाची श्रीमंती होती ती सामान्य माणसाचा पाठिंबा! आनंद दिघे आज लौकिक अर्थाने हयात नसले तरी सर्वसामान्यांच्या मनात ते आजही जिवंत आहेत

. अशा ‘लार्जर दॅन लाईफ’ व्यक्तिमत्वावर चित्रपट बनवणे हे शिवधनुष्य पेलण्याइतकंच जिकरीचं आणि त्यातही त्यांची व्यक्तिरेखा साकारणं हे त्याहूनही अवघड काम. परंतु या दोन्ही जबाबदाऱ्या अतिशय सक्षमपणे आपल्या खांद्यावर घेतल्या त्या दिग्दर्शक प्रवीण तरडे आणि अभिनेते प्रसाद ओक यांनी. आनंद दिघे यांचा एवढा मोठा जीवनप्रवास चित्रपटात मांडणं तसं अवघडच काम पण हा सगळा घाट घातला तो निर्माते मंगेश देसाई यांनी. त्यांच्या साहिल मोशन आर्टने या चित्रपटाची निर्मिती केली.

चांगल्या कलाकृतींच्या मागे भक्कमपणे उभे राहण्याचं काम झी स्टुडिओज ही निर्मितीसंस्था कायमच करत आलेली आहे. याही चित्रपटासाठी आता झी स्टुडिओज निर्माते आणि प्रस्तुतकर्ते अशी दुहेरी जबाबदारी पार पाडणार आहे. येत्या 13 मे रोजी ‘धर्मवीर मु. पो. ठाणे’ हा चित्रपट झी स्टुडिओजच्या माध्यमातून महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *