मंञालयात ही ओमायक्राॕन चा शिरकाव दोन पोलीस व एक कर्मचारी बाधीत ,नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन

चालू घडामोडी मंञालय राजकीय
Share now
Advertisement

नियमाचे पालन करावे ,रुग्नसंख्या वेगाने वाढत आहे .नागरिकांनी लाॕकडाऊन पर्यंतची वेळ आणू नये – गृहमंत्री दिलीप वळसेपाटील

लोकहित न्यूज,मुंबई दि.30/12/2021

गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येसोबतच राज्यातील ओमायक्रॉनच्या रुग्णसंख्येत देखील सातत्याने वाढ होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा आणि प्रशासनाची चिंता वाढली आहे. राज्यात पुन्हा एकदा निर्बंध लागू करण्याचा विचार राज्य सरकार करत असून त्यासंदर्भात मुख्यमंत्री आज किंवा उद्या निर्णय घेणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

नागरिकांनी नियमाचे पालन करावे ,रुग्नसंख्या झपाट्याने वाढत आहे लाॕकडाऊन पर्यंत ची वेळ आणू नये गृहमंत्री दिलीप वळसेपाटील यांचे नागरिकांना आवाहन..

त्यातच आता राज्याच्या मंत्रालयात देखील ओमायक्रॉन बाधित सापडल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाल्या असून या बाधितांना तातडीने विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलं आहे.मंत्रालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची दर आठ दिवसांनी आरटीपीसीआर चाचणी करण्यात येते. त्यानुसार करण्यात आलेल्या चाचणीत संबंधित तीन कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले.

त्यामध्ये दोन पोलीस कर्मचारी आणि एक क्लार्क असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी अश्विनी पाटील यांनी दिली आहे. हे तिघे कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर त्यापैकी दोन जण विलगीकरण कक्षात तर एक व्यक्ती होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *