दै.सकाळ चे हडपसर प्रतिनिधी युवा पञकार संदीप जगदाळे यांचे निधन

चालू घडामोडी महाराष्ट्र
Share now
Advertisement

दै.सकाळचे हडपसर प्रतिनिधी पञकार संदीप जगदाळे यांचे कोरोनामुळे निधन.

लोकहित न्यूज ,पुणे दि.13/05/2021

दै,सकाळचे हडपसर भागातील युवा पञकार संदीप जगदाळे वय (45) यांचे कोरोना संसर्गामुळे दुःखद निधन झाले. ते हडपसर परिसारात अनेक वर्षापासुन बातमीदारी करीत होते. मनमिळावू प्रसन्न स्वभावाचे असल्यामुळे जनमानसात लोकप्रिय होते. ते कोरेगाव पार्क येथिल एका अंध संस्थेत समाजसेवक पदी कार्यरत होते .हडपसर येथिल नोबेल हाॕस्पीटल मध्ये तब्बल 24 दिवसापासुन ते अॕडमीट होते. मागील चार पाच दिवसापासून त्यांची प्रकृती अचानक खालावली व आज त्यांची प्राणज्योत मालवली . त्यांनी पञकारितेत विपुल लिखान केले होते त्यामुळे परिसरातील अनेक विषय मार्गी लागले .संदीप जगदाळे मूळचे मूर्टी ता.बारामती रहीवासी होत पण शिक्षण व कामानिमित्ताने पुण्यात स्थायिक झाले.रयत शिक्षण संस्थेतील कार्यरत शिक्षिका सारिका संदीप जगदाळे या त्यांच्या पत्नी होत.त्यांच्या पश्चात आई वडील, पत्नी, एक मुलगा.भाऊ,भावजय,दोन बहीणी असा परिवार आहे.त्यांच्या अकाली निधनामुळे हडपसर परिसरातील पञकारितेत पोकळी निर्माण झाली त्यांच्या निधनाच्या वृत्तामुळे पञकार बांधव ,राजकीय ,सामाजिक कार्यकर्ते दुःख व्यक्त करत आहेत.संदीप यांच्या पञकारितेतील उत्तम कार्यामुळे विविध संस्था ,संघटनेकडून उत्कृष्ट पञकार म्हणून गौरविण्यात आले होते.त्यांच्या निधनामुळे पञकार क्षेञात शोककळा पसरली आहे.लोकहित न्यूज कडून पञकार संदीप जगदाळे यांना भावपूर्ण श्रध्दांजली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *