लोकहित न्यूज ,मुंबई दि.13/05/2021
ईमेज बिल्डींग व सोशल मिडीया मार्केटींगसाठी 6 कोटी शासकीय निधी केला होता मंजूर…विरोधकाकडून कडाडून विरोध तर जनतेमध्ये ही उठली होती टिकेची झोड ,निर्णय बदलला.
राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे. अनेक ठिकाणी आरोग्य सुविधांचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे अनेक जणांना आपले प्राण गमवावे लागले आहे. या सर्व परिस्थितीमुळे राज्याच्या तिजोरीवर मोठा ताण पडला आहे. असं असून देखील राज्यसरकारची उधळपट्टी मात्र सुरूच आहे. नुकताच हाती आलेल्या माहितीनुसार राज्य सरकारकडून उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्या सोशल मीडियासाठी तब्बल ६ कोटींचा निधी देण्यात आला आहे. या निर्णयानंतर संपूर्ण राज्यातून टीका होत होती.
तसेच विरोधी पक्षाकडून ही कडाडून विरोध झाला.याच पार्श्वभूमीवर स्वतः अजित पवार यांनी हा निर्णय रद्द केला आहे. उपमुख्यमंत्री कार्यालयाचा सोशल मीडिया सांभाळण्यासाठी बाह्ययंत्रणा नियुक्त करण्याची अजिबात गरज नाही, यासंदर्भातील शासननिर्णय तात्काळ रद्द करण्यात यावा असे निर्देश उपमुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.