लशीची एकच किंमत का नाही ? जनतेच्या मनात संशय निर्माण होत आहे याला जबाबदार कोण – मंञी नवाब मलीक

मंञालय राजकीय
Share now
Advertisement

लसीची आधी जास्त आणि नंतर कमी किंमत करुन जनतेच्या मनात संशय निर्माण करणारा विषय ठरतोय – नवाब मलिक

याला पुनावाला स्वतः जबाबदार;त्यांना कोण बदनाम करत नाहीय…

लशीची किंमत कमी केल्यामुळे संशय निर्माण झाला असे पञकारांना उत्तर देताना मंञी नवाब मलीक

लोकहित न्यूज ,मुंबई

मुंबई दि. 3 मे 2021 – केंद्राला १५० रुपये, राज्याला आधी ४०० आणि नंतर ३०० रुपये तर खाजगी हॉस्पीटलसाठी ७०० रूपये लस देण्याचे पुनावाला यांनी जाहीर केले हा सगळा संशय निर्माण करणारा विषय असून याला पुनावाला स्वतः जबाबदार आहेत त्यांना कोण बदनाम करत नसल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी व्यक्त केले आहे.

माध्यम प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना नवाब मलिक यांनी वरील माहिती दिली.

सुरुवातीला राज्याला ४०० रुपयांनी लस देणार असल्याचे सांगितले मग त्यांनी ३०० रुपये भाव स्वतः जाहीर केला. हे सगळं संशय निर्माण करणारे विषय आहेत. ज्यापध्दतीने ४०० रुपये किंमत ठरवतात आणि नंतर ट्वीट करुन ३०० रुपयाला द्यायला तयार आहे असे सांगितले. हा जो संशय निर्माण होतोय त्यामुळे देशातील जनतेच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले असल्याचे नवाब मलिक म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *