होय..शरद पवार पंतप्रधान पदाचे उमेदवार ?काँग्रेस बरोबर विरोधी पक्षानी दिले संकेत..

देश/विदेश राजकीय
Share now
Advertisement

लोकहित न्यूज नेटवर्क नवी दिल्ली ..

दि.11 डिसेंबर 2020

महाराष्ट्रात सत्तास्थापनेसाठी एकत्र आलेल्या शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादी या भिन्न विचारसरणीच्या पक्षांचं वर्षभरात चांगलंच नियोजन जमल्याचं पाहायला मिळालं आहे.ठाकरे सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त तिन्ही पक्षांनी पाचच नव्हे, तर पंचवीस वर्ष सत्तेत एकत्र राहण्याची निर्णायक दूर दृष्टी बोलून दाखविले . त्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रीय स्तरावरही अशाच प्रकारे विरोधी पक्षांशी मोट बांधली जावी, यासाठी काँग्रेसने गळ घातली असल्याचे बोलले जाते आहे. विशेष म्हणजे शरद पवारांना पंतप्रधानपदाचा उमेदवार करण्याचीही त्यांची तयारी आहे.

शरद पवार यांनी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रासारखी महाविकास आघाडी केंद्रीय स्तरावर करण्याची मागणी केली जात आहे. काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी या संबंधीचा प्रस्ताव शरद पवार यांना दिल्याची माहिती दिल्लीवर्तुळातून मिळत आहे. विरोधी पक्षाला एकत्र करुन आगामी लोकसभा निवडणुकीचं नेतृत्व करावं, असा प्रस्ताव काँग्रेसने दिला आहे.

पवारांना पंतप्रधानपदाचा उमेदवार करण्याची मागणी होत आहे.

शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली काल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी कृषी कायदा रद्द करण्यासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. आगामी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर शरद पवार यांना पंतप्रधानपदाचा उमेदवार घोषित करण्याची तयारीही काँग्रेससह अनेक विरोधी पक्ष करत आहेत, अशी माहिती विरोधीपक्षाच्या वरिष्ठ नेते देत आहेत .

शरद पवारच का योग्य असावेत ?

पुढील लोकसभा निवडणुकांमध्ये राहुल गांधी यांना थेट पंतप्रधानपदाच्या शर्यतीत उतरवण्याऐवजी शरद पवार यांच्यासारखा अनुभवी चेहरा देण्याचा काँग्रेसचा नियोजन पहायला मिळत आहे. शरद पवार यांच्याकडे असलेले नेतृत्वगुण, दांडगा अनुभव, संयमी राजकीय वृत्ती , मुत्सुद्दीपणा,विरोधी पक्षांची मोट बांधण्याची क्षमता याचा फायदा करुन घेण्याचा काँग्रेसचा इरादा असणार आहे.

शरद पवारांच्या नेतृत्वातच राष्ट्रपतींची भेट घेतली

शरद पवार यांच्यासह काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, माकप नेते सीताराम येचुरी, भाकप नेते डी. राजा, द्रमुक नेते टीकेएस एलानगोवन या विरोधीपक्षातील दिग्गजांच्या शिष्टमंडळाने राष्ट्रपतींची भेट घेतली. यावेळी देशात पेटलेल्या शेतकरी आंदोलनावर राष्ट्रपतींसोबत चर्चा केली. कृषी कायदे रद्द करण्यासाठी सरकारला निर्देशित करण्याबाबत हस्तक्षेप करावा, अशी मागणी शरद पवारांसह शिष्टमंडळातील नेत्यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *