कोल्हापूर वार्ताहर दि.2 डिसेंबर 2020
पुणे पदवीधर मतदारसंघात हॕट्रीक चे स्वप्न चंद्रकांत दादांनी पाहू नये यावेळी त्यांची बोल्ड उडणार आहे असा टोला पालकमंत्री सतेज पाटील यांनी कोल्हापूर येथे प्रसिद्धी माध्यमाबरोबर बोलताना लगावला. शिवाजी पेठ येथील मतदान केंद्रावर भेटीसाठी आले असता ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते यावेळी पालकमंत्री पाटील म्हणाले की पुणे पदवीधर आणि शिक्षक या दोन्ही मतदारसंघात पक्षीय पातळीवर पहिल्यांदाच निवडणूक मतदार नोंदणी पासून मतदाना पर्यंत मायक्रो प्लॅनिंग केले आहे. पुणे, सोलापूर, सांगली ,सातारा पक्षाची यंत्रणा मतदारांपर्यंत पोहोचली आहे, त्यामुळे दोन्ही उमेदवार निश्चितपणे विजय होतील असा दावा मंत्री पाटील यांनी केला .भाजपचे उमेदवार संग्राम देशमुख यांनी कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांची मतदान केंद्रावर भेट झाली याविषयी विचारले असता त्यांनी सांगितले एकमेका समोर आल्यानंतर नमस्कार करणे आदर भावना व्यक्त करणे यात गैर काही नाही याचा वेगळा अर्थ कोणीही काढू नये असे स्पष्ट केले.