प्रचंड लोकप्रिय विकासरत्न आमदार मा.मंञी प्रा.डाॕ.तानाजी सावंत सर यांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा.
वाढदिवस विशेष लेखक नितीन जाधव.
तब्बल चार दशक उस्मानाबाद (धाराशिव) येथिल जनता न्यायाच्या ,आधाराच्या ,विकासाच्या शोधात होती पण ना न्याय ना आधार मिळत होता परंतु 2019 च्या विधानसभा निवडणूकीत भूम परंडा वाशी च्या जनतेने जलसंधारण मंञी राहीलेले , कामाच्या बाबतीत आक्रमक ,रोखठोक स्वभावाचे व दानशुर मनाचे विकास पुरुष असलेले तानाजी सावंत सर यांना आमदार पदी भरघोस मतांनी विजयी केले आणि राष्ट्रवादीचे मनसुबे धुळीस मिळवले . शिवसेनेचे महाराष्ट्रातील मुख्य उपनेते तसेच सोलापूर व उस्मानाबाद जिल्ह्याचे संपर्कप्रमुख पद ही तानाजी सावंत यांचेकडे च आहे.
तानाजी सावंत हे बहुआयामी व्यक्तीमत्व आहे.अनेक क्षेत्रांत पारंगत असून कधी ही बङेजाव नाही साध ,सोबर राहणीमान,कायमच कामात व्यस्त ,कमी व मुद्देसुद अभ्यासपूर्ण चर्चा करतात .
मतदारसंघ तसेच जिल्हा व महाराष्ट्रातील शिवसैनिकांत नवऊर्जा प्रेरणा निर्माण होईल असे नागरिकांच्या जिव्हाळ्याचे ,अङचणीचे प्रश्न सोडविण्यात नेहमी अग्रेसर असतात .सामाजिक ,शैक्षणिक ,शेतीविषयक,मतदार संघातील ऐनवेळचे विषय ,प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी प्रा.सावंत प्रतिष्ठाणच्या माध्यमातून स्वतंञ टिम कार्यरत आहे.राजकारणा बरोबर समाजकारण,शैक्षणिक विकास ,वैज्ञानिक प्रगती ,सांस्कृतिक व्यासपीठ,शेतीप्रश्न ,उद्योजकीय सहभाग ,सहकारातून समृद्धी कडे चा नारा देत ग्रामीण भागाचा कायापालट ,ग्रामीण भागातील विशेषतः मतदारसंघातील तरुणांना स्वतःच्या साखर कारखान्याच्या माध्यमातून हजारों ना रोजगार ,व्यवसाय निर्माण करुन दिले आहेत. पुणेस्थित स्वतःच्या जेएसपीएम शैक्षणिक संस्थेमार्फत घरोघरी ज्ञानाची गंगा पोहचवण्याचे अव्याहतपणे कार्य सुरु आहे. तसेच भैरवनाथ साखर उद्योगाच्या माध्यमातून उस्मानाबाद ,सोलापूर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना भरघोस लाभ मिळवून देत शेतकऱ्यांचे जीवनमान उंचवण्यात मोलाचा वाटा आहे.
तसेच स्वखर्चातून मतदारसंघातील 550 किमी नदी,नाले,ओढे ,यांचे खोलीकरण ,सरळीकरण ,रुंदीकरण करुन चाळीस गावात पाणी खेळवले आहे.यामुळेच सावंत सरांना शिवजल क्रांतीचे प्रणेते म्हणतात ही योजना संपूर्ण महाराष्ट्रात गाजली व शिवजल क्रांतीचा परंडा पॕटर्न म्हणून नावलौकीकास आली , या योजनेला वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवजल क्रांती असे नाव आहे..मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांनी शिवजल क्रांती योजनेचे अनेकवेळा कौतुक केले असून आमदार तानाजी सावंत यांनी राबवलेल्या जलसंधारण योजनाचा ईतरांनी आदर्श घेण्याचे आवाहन केले होते.
संपूर्ण सावंत कुटूंबीयांनी समाजकारणाचा वसा हाती घेतला असून प्रत्येक वर्षी हजारोंच्या संख्येने सामुदायिक विवाहसोहळे आयोजित केले जातात त्याचा सर्व खर्च सामाजिक जाणिवेतून प्रा,तानाजी सावंत प्रतिष्ठान करते आहे.या प्रतिष्ठाण च्या माध्यमातून विविध सामाजिक कार्ये केली जातात त्याचा मतदारसंघातील जनतेला लाभ होताना दिसतो. एकंदरीतच प्रा.तानाजी सावंत यांच्या रुपाने भूम परंडा वासीयांना दमदार,दानशूर,विकासरत्न ,पाणीदार आमदार लाभला हे माञ नक्की आहे.
आज आमदार तानाजी सावंत सर यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्ताने त्यांच्या राजकीय ,सामाजिक, उद्योजकीय कार्यशैलीवर थोडक्यात टाकलेला प्रकाशझोत.साहेबांना वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा.
लेखक नितीन जाधव.
जनसंपर्क अधिकारी तथा
मंञालय मुख्य संपर्क प्रमुख
महाराष्ट्र राज्य मराठी पञकार संघ,मुंबई
संपर्क 9326398001