पुणे महानगरपालीका निवडणूक पार्श्वभूमीवर उपमुख्यमंञी अजित पवार यांची आज पुण्यात बैठक

चालू घडामोडी महाराष्ट्र राजकीय
Share now
Advertisement

शहर ,जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती चा ही घेणार आढावा..

लोकहित न्यूज,पुणे दि.12/02/2022

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक महत्वाची आहे. पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार आज पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची बैठक घेत आहेत.

राज्यात नगरपंचायत निवडणुका पार पडल्यानंतर महापालिका निवडणुकांचे पडघम वाजत आहेत. प्रभाग रचना निश्चित करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक महत्वाची आहे. पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार आज पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची बैठक घेत आहेत. तसेच शहर ,जिल्ह्यातील कोवीड परिस्थितीचा आढावा अजित पवार घेणार आहेत.

प्रत्येक प्रभागाच्या रचनेविषयी माहीती घेवून मुख्य पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यासोबत पवार मुक्त संवाद साधणार आहेत. या निमित्ताने ईच्छुक उमेदवार अजित पवार यांचेसोबत संवाद साधून प्रभागातील प्रत्यक्ष परिस्थिती सांगून कार्यअहवाल मांडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *