लोकहित न्यूज पुणे दि.3 डिसेंबर 2020
अरुणदादा बेल्हेकर राष्ट्र निर्माण संस्थेमार्फत वृत्तपञ विक्रीक्षेञातील कष्टाळू दिव्यांग बांधव डिंबळे यांना दिव्यांग प्रेरणा पुरस्काराने सन्मानित करुण गौरव केल्यामुळे दिव्यांगाना जगण्याची नवी प्रेरणा मिळेल .
शासनाच्या विविध योजनाची माहीती देणारी कार्यशाळा दिव्यांगासाठी फायदेशीर डाॕ.सचिन आबणे
दिव्यांग बांधवांनी कष्टातून मेहनतीने सर्व क्षेत्रात आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे.त्यांना समाजाकडून सहानभूतीची नव्हे तर प्रेमाची अपेक्षा आहे.असे अस्थिरोग तज्ञ डॉ.सचिन आबणे यांनी सांगितले.
अरूणदादा बेल्हेकर युवा राष्ट्रनिर्माण संस्थेच्या वतीने दिव्यांग असून वुत्तपत्र विक्रेता म्हणून हडपसर परिसरात वीस वर्षे काम करणाऱ्या प्रवीण डिंबळेला दिव्यांग प्रेरणा पुरस्कार देऊन डॉ.आबणे यांच्या हस्ते गौरवण्यात यावेळी ते बोलत होते.या कार्यक्रमाप्रसंगी संस्था अध्यक्ष शैलेंद्र बेल्हेकर,नेत्ररोगतज्ञ डॉ.वंदना आबणे,डॉ.सुयोग काळभोर,अतुल रासकर,गोरक्ष आडेकर,सुनिल बनसोडे उपस्थित होते.यावेळी डॉ. आबणे हॉस्पिटल मधील सर्व आरोग्यसेवकांना कोरना काळात जीवधोक्यात घालून रुग्णांची सेवा केल्याबद्दल गुलाबाचे रोपटे देऊन सन्मानित करण्यात आले.
डॉ.आबणे पुढे म्हणाले दिव्यांग बांधवांना शासनाच्या विविध योजनांची माहिती देणारी कार्यशाळा सामाजिक संस्थानी आयोजित केल्या तर त्याचा लाभ दिव्यांगांना मोठ्या प्रमाणात मिळेल.