रोखठोक लेखक नितीन जाधव
नेता कोणाला म्हणावे , आमदार खासदार यांच्या पेक्षा ही नेत्याची ताकद जास्तच का असते आमचा नेता सुरेश (आण्णा ) घुले खरच आहेत लय पाॕवरफुल..
नितीन जाधव,लोकहित न्यूज पुणे ,दि.21/06/2021
सध्या अनेक कार्यकर्ते , पक्षाचे पदाधिकारी ,एवढेच नव्हे तर आमदार ,खासदार सुध्दा जनतेला अपेक्षित असलेला न्याय मिळवून देऊ शकत नाहीत माञ नेता असल्या सारखे बडेजाव करताना दिसतात. लोकप्रिय नेत्याची कार्याची उंची ताकद कैक पटींनी जास्तच असते त्याचप्रमाणे आमचा नेता सुरेश (आण्णा ) घुले खरच आहेत लय पाॕवरफुल ..
पुणे नाशीक हायस्पीड रेल्वे प्रकल्प बाधीत शेतकरी, प्लाॕटधारकांचे प्रश्न सोडविण्यात राष्ट्रवादीचे नेते सुरेश (आण्णा) घुले यशस्वी..
जनसामान्यात राहुन कोणत्याही जातीच्या, पंथाच्या ,पक्षाच्या व्यक्तीचा विचार न करता जनतेला परिपूर्ण न्याय देण्यासाठी स्वतः जनतेसोबत अखंड उभे राहुन यशस्वी मार्गा पर्यंत पोहचवतो त्याला नेता म्हणतात.
सामान्यातील असामान्याला सुध्दा विकासाची संधी मिळावी ,समाजातील शेवटातील शेवटच्या वंचिताला सुध्दा अपेक्षित फळ मिळावे यासाठी निःस्वार्थी पणे ,सातत्याने अभ्यासपूर्ण संघर्ष करुन सरकार दरबारी जनतेला न्याय मिळवून देण्याची ताकद ज्याच्या कडे असते त्याला नेता म्हणतात.
ज्याच्या नेतृत्वाची कार्य कौशल्याची ,समंजस दिलखुलास स्वभावाची छाप जनतेच्या सर्वसामान्यांच्या मनात कायम घर करुन असते त्याला नेता म्हणतात .
कधी कधी पक्षाच्या , स्वतःच्या परिसीमा ओलांडून सुध्दा प्रवाहाच्या विरुध्द लढा देत जनसामान्यांची प्रगती साधतो त्याला नेता म्हणतात .
सामान्य कुटूंबातील अभ्यासू होतकरु व्यक्तीना सुध्दा राजकीय प्रवाहात ,सामाजिक जीवनात कायम पाठींबा देतो ,साध्या कार्यकर्ते ची जडणघङण करुन राजकीय संधी देत पाठीशी उभे राहतो त्याला नेता म्हणतात.
खरच मिञांनो सदरच्या निष्कर्षा वरुन आपल्या लक्षात आले असेल आमदार ,खासदार पेक्षा ही नेत्याची ताकद जास्तच असते.
मांजरीबु ता.हवेली पुणे येथिल शेतकऱ्यांचा ,प्लाॕटधारक बाधीतांचा कळीचा व गुंतागुंतीचा ,ञासाचा प्रश्न राष्ट्रवादीचे लोकप्रिय नेते सुरेश (आण्णा ) घुले यांनी उपमुख्यमंञी अजित दादा पवार यांच्या समोर मांडून मार्गी लावला आहे.
अशा अभ्यासू ,कृतीशील ,निर्णयक्षम ,नेतृत्व संपन्न नेत्याचे मांजरी वासीयांच्या वतीने कोटी कोटी आभार…रेल्वे प्रकल्प बाधित प्रत्येक व्यक्ती ने मनाशी कोणताही मुलाहीजा न बाळगता अशा नेत्याचे मनःपूर्वक आभार मानायला हवेत .
आपला पञकार मिञ
नितीन जाधव.
मंञालय मुख्य संपर्क प्रमुख.
महाराष्ट्र राज्य मराठी पञकार संघ,मुंबई मो 9326398001