फडणवीसांची ट्वीटर पोस्ट प्रचंड वायरल समाज माध्यमातून विविध कमेंट..
लोकहीत न्यूज. मुंबई दि 22/05/2022
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, यांनी राज्य सरकारने पेट्रोल डिझेल किंमत कमी करून सामान्य ला दिलासा दिला नसून जनतेची क्रूर थट्टा केली असल्याचे म्ह्टले आहे. त्यानी आपल्या पोस्ट मध्ये सरकारचा समाचार घेतला.अन्य राज्य 7ते 10रु दिलासा देत आहेत आणि आपण केवळ 1.5 ते 2 रु कमी करता..
इंधन दरकपात करताना केंद्र सरकारने 2,20,000 कोटी रुपयांचा आर्थिक भार घेतला असताना किमान महाराष्ट्राच्या आर्थिक लौकिकाला साजेशी घोषणा अपेक्षित होती
देशाच्या जीडीपीमध्ये आपला वाटा 15 टक्के!
इंधन दर कपातीत किमान 10 टक्के तर भार घ्यायचा.
पण नाही!
याला म्हणतात ‘उंटाच्या तोंडात जिरे’!
अन्य राज्य सरकारे 7 ते 10 रुपये दिलासा देत असताना महाराष्ट्रासारख्या राज्याने 1.5 आणि 2 रुपये दर कमी करणे, ही सामान्य माणसाची क्रूर थट्टा आहे.
मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत असताना मनाचा थोडा मोठेपणा दाखविला असता तर बरे झाले असते! अशा आश्याची ट्विटर पोस्ट देवेंद्र फडणवीस यांनी केली असून समाज माध्यमातून त्याला प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे.
तर नेटकऱ्यांनी विविध कमेंट करत केंद्र व राज्य सरकारला धारेवर धरत समाचार घेतला आहे. केंद्र व राज्य सरकारने थोडासा दिलासा दिल्याने अनेकांनी समाधान व्यक्त केले आहे.