संभाजी राजे छत्रपती यांना शह देण्यासाठी कोल्हापुरातून संजय पवार यांना सेनेकडून उमेदवारी तर भाजपा तिसरी जागा लढवत निवडणुकीत रंगत आणणार.

चालू घडामोडी देश/विदेश मुंबई राजकीय
Share now
Advertisement

लोकहित न्यूज, कोल्हापूर.दि 24/05/2022

संभाजी राजे छत्रपती यांना शह देण्यासाठी कोल्हापुरातुनच सेना उमेदवार देणार असून शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांचे नाव समोर येत आहे तर भाजपा तिसरी जागा लढवत निवडणुकीत रंगत निर्माण करणार असल्याचे समजते. राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेना उमेदवार देणार असून त्यास महाआघाडी तील राष्ट्रवादी व काँग्रेस पक्ष पाठिंबा देत मतदान करणार असल्याचे सुतोवाच शरद पवार तसेच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष्य नाना पटोले यांनी दिले आहेत. त्यातच आता भाजपा ने सुद्धा तिसरी जागा लढवत निवडणुकीत रंगतभरणार आहे. यामुळे आमदारांची फोडाफोडी होणार हे नक्की आहे. सेना, राष्ट्रवादी व काँग्रेस यांची प्रत्येकी एक जागा तर भाजपचे संख्याबळ जास्त असल्याने दोन जागा निवडून येतील हे जरी निश्चित असले तरी सहावी जागा कोण जिंकणार हे औतुसंक्याचे ठरणार आहे.

संभाजी राजे छत्रपती यांना मराठा समाजाने म्हणजे मराठा संघटनानी पाठिंबा दिला असून महाआघाडी तील नेत्यांना विनंती केली असल्याचे जाहीर आहे. पण शिवसेना आपल्या मतावर ठाम असून तसेच संभाजी राजे शिवसेनेत प्रवेश करणार नसल्याने सेनेने आपल्या उमेदवारची चाचपनी केली असून राजेंना कोल्हापुरातून च शह देण्याचे जबरदस्त नियोजन केले आहे. शिवसेनेचा हा निर्णय मराठा समाजाला आवडला नसून कोल्हापुर सह महाराष्ट्र तील छत्रपती ला मानणारा समाज सेनेच्या विरुद्ध उभा राहण्याची शक्यता असल्याची माहिती मिळत आहे. मराठा समाजाचे शिष्टमंडळ मराठा आमदारांना राजेंच्या पाठीशी राहण्याबाबत विनंती करणार आहे. तसेच सेना नेते संजय राऊत व खुद्द मुख्यमंत्री ठाकरे यांनी सहावी जागा सेना उमेदवारच जिकूंन विजयी होईल असे सांगितले आहे.

तर दुसरीकडे भाजपा सुद्धा तिसरा उमेदवार देण्याची चाचपनी करत आहे. ऐकनदरीतच राज्य सभेच्या सहाव्या जागेसाठी फोडाफोडी होणार असून भाजपा काय भूमिका घेते हे पाहावे लागणार आहे. तसेच आघाडीतील आमदारांनी अतिरिक्त मते राजेंच्या पारड्यात टाकली व भाजपाची काही मते राजेंना मिळत असतील तर छत्रपती चा विजय सुकर होऊ शकतो. तथापि संजय राऊत त्यांचा डाव हाणून पाडतील असा सेनेचा कयास आहे. पण जर मराठा आमदारांनी राजेंविषयी मराठा ऐक्य दाखवले तर आश्चर्य वाटायला नको.

पक्षीय बळ व राजकीय वाटाघाटी समीकरणे कशी असू शकतात.


राज्यसभेसाठीची तिसरी जागा भाजपने लढवल्यास फोडाफोडी करावी लागणार आहे. त्यातच संभाजीराजे यांनी सहावी जागा अपक्ष लढवण्याचं जाहीर केले आहे. त्यामुळे महाविकास आघाडी आपले मत संभाजीराजेंच्या पारड्यात टाकते की शिवसेनेला मदत करणार याची उत्सुकता आहे. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेसचे सरकार आहे. महाविकास आघाडीकडे चार जागा जिंकून येऊन शकतात एवढी मते आहेत. सध्या महाविकास आघाडीकडे 169 आमदार आहेत. शिवसेना 55, राष्ट्रवादी 54, काँग्रेस 44, इतर पक्ष 8 आणि अपक्ष 8 असं महाविकास आघाडीकडे संख्याबळ आहे.

तर विरोधी पक्ष भाजपकडे 113 आमदारांचं संख्याबळ आहे. भाजपचे 106 आमदार, रासप 1, जनसुराज्य 1 आणि अपक्ष 5 आमदार अशा एकूण 113 आमदार भाजपकडे आहेत. राज्यसभेच्या एका जागेसाठी 42 मतांची गरज असते. संख्याबळानुसार शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा एक उमेदवार सहज राज्यसभेवर निवडून जाऊ शकतो. तर भाजपचे दोन उमेदवार राज्यसभेवर जाऊ शकतात. तिसरी जागा भाजपने लढवल्यास मोठी चुरस होण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *