लोकहीत न्यूज,
मंत्रालय मुंबई दि 28/07/2022
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख पदी मंगेशजी चिवटे यांची निवड झाल्याबद्दल मुंबई लोकमत चे जेष्ठ संपादक तथा डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेचे प्रदेश अध्यक्ष राजाभाऊ माने, जनसंपर्क विभागाचे कार्यालय अधीक्षक सुनिलजी खाडे, राज्य मराठी पत्रकार संघाचे मंत्रालय मुख्य संपर्क प्रमुख नितीनजी जाधव यांनी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार केला. तसेच पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.
मंगेशजी चिवटे यांनी ग्रामीण भागातून येत मुंबई सारख्या ठिकाणी उत्तम पत्रकारिता केली. समाज जागृतीचे कार्य करत असताना मुख्यमंत्री कार्यालयामार्फत राज्यभरातील गोरगरीब वंचित घटकसाठी वैद्यकीय सेवा निधी मिळावा त्यातून अनेकांचे प्राण वाचले जातील या संकल्पनेतून मुख्यमंत्री वैद्यकीय कक्ष सुरु करण्याची योजना निर्माण केली. त्याचा आज अनेक आजारी दुर्लक्षित गोरगरीब रुग्णांना आधार होतं आहे. ही योजना संकल्पना अतिशय यशस्वी ठरली आहे.
नवे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी त्यांचे उत्तम अभ्यासू कार्य पाहून मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी काक्षाचे विशेष कार्यकारी अधिकारी पदी अर्थातच प्रमुख पदी नियुक्ती केल्यामुळे राज्यभरातून त्यांचे कौतुक होतं आहे. अभिनंदन केले जात आहे.