आता घरांच्या किंमती नियंत्रित राहणार ठराविक जमीनीवर जास्त बांधकाम करण्याची मूभा.

महाराष्ट्र
Share now
Advertisement

लोकहित न्यूज. मुंबई १ डिसेंबर 2020

घरांच्या किमती नियंत्रित राहणार बांधकामाचे क्षेत्र वाढणार.ठराविक जमिनीवर जास्त बांधकामाची मूभा असेल.

तसेच विद्यमान विकास नियंत्रण नियमावलीनुसार टीडीआर, प्रीमिअरच्या सवलती घेत कमीतकमी 1.15 आणि जास्तीत जास्त 2.55 चटईक्षेत्र निर्देशांकानुसार बांधकाम करता येत होते .मात्र नव्या युनिफाईड डीसीआर मधील सुधारित तरतुदीनुसार ही मर्यादा 1.60 ते 3 पर्यंत वाढणार आहे त्याशिवाय सध्या प्राप्त असलेल्या बांधकाम पेक्षा किमान 30 ते 35 टक्के जादा बांधकाम करण्याची परवानगी विकसकांना मिळेल अशी माहिती नगर विकास विभागातून मिळत आहे. गेल्या तीन वर्षांपासून प्रतीक्षेत असलेली सुधारित नियमावली मंजूर झाल्याची माहिती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच दिली आहे. विधान परिषद निवडणुकीनंतर ती अधिकृत रित्या लागू होणार आहे .विद्यमान प्रचलित नियमावलीमध्ये एफएसआय मध्ये वाढ झाली आहे .सध्या मुंबई वगळता उर्वरित सर्व महापालिकांमध्ये बेस एफएसआय एक असून आरजीचे क्षेत्र वगळता तो 0.85 ईतकाच होते .या बांधकामांना 2016साली मंजूर झालेल्या धोरणानुसार रस्त्याची रुंदी नुसार टीडीआर मिळतो. त्याशिवाय 0.33 टक्के प्रिमीयम एफएसआय घेण्याची तरतूद सुद्धा आहे.तसेच वेगवेगळ्या पालिकांमध्ये बाल्कनी, जिना आदी क्षेत्र प्रिमियम आकारुन देण्याची मुभा आहे या परवानग्यांसाठी वापरले जाणारे स्वतंत्र नियमावली आता हद्दपार करण्यात आली आहे, याच कारणामुळे घरांच्या किमती नियंत्रणात राहतील ठराविक जमिनीवर जास्त बांधकाम करण्याची मुभा मिळाल्याने विकासकांच्या प्रकल्प खर्चात कपात होईल त्यामुळे घरांच्या किमती नियंत्रणात राहतील आवाक्याबाहेर जात असलेले गृहखरेदीचे स्वप्न साकार करणे अनेक कुटुंबांना शक्य होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *